धर्माबाद शहरात अवैध शिंदी भट्टी आशीर्वाद कोणाचा* *नागरिकांचा विरोध तरी प्रशासनाची भूमिका संशयित
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.18.जिल्यातील धर्माबाद शहरात रत्नाळी येथे काल पासून अवैध शिंदी भट्टी ची शुभारंभ करण्यात आले आहे.
जिल्यातील देगलूर तालुक्या मधील शिंदी-ताडी विक्रेत्यानें आपले देगलूर मधील बस्तान गुंडाळून धर्माबाद येथील (रत्नाळी) येथे आपला संसार थाटऊन आपला विस्तार करण्याच्या तयारीत असल्याचे विश्वासनीय सूत्रांकडून माहिती मिळाली होती मात्र आज ती खरी होताना दिसली आहे.
1)प्रस्तुत पार्श्वभूमीवर नगर परिषदेस मुख्याधिकारी नीलम कांबळे यांच्याशी संपर्क साधून या शिंदी विक्रेत्याने नगर परिषदेची परवानगी घेतली का? या विषयी चौकशी केली असता त्यांनी ‘नाही’ असे स्पष्ट शब्दात सांगितले.नगर परिषदेची परवानगी नसताना,गावाकऱ्यांची सहमती नसताना कशाच्या बळावर हा भट्टी चालक हिंमत करत आहे?
2) शिंदीच्या व्यसनामुळे आमच्या गावातील अनेक तरुणांचा हाकनाक बळी गेला असून आम्ही ही शिंदी भट्टी चालू देणार नाही. वेळ प्रसंगी महिला घेऊन आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन करू.ग्रामस्थ,युवकांनी व समस्त गावकरी आपली भावना व्यक्त केली आहे.
काल या अवैध शिंदिच्या भट्टी चे थाटात शुभारंभ झाले असून येथील प्रशासनाची अर्थ पूर्ण तडजोड झाली असल्याचे दिसत आहे.
त्यामुळे बिन्दास्त शिंदी विक्री होत असताना ही प्रशासन मात्र मूग गिळून एडगावला जाऊन पेडे खात असल्याचे चित्र पहाव्यास मिळत आहे.
धर्माबाद तालुक्यातील चेरलेवार यांचे शिंदीचे बन वगळता एकही झाड नाही तरीही उत्पादन शुल्क विभागाने यांना स्थलांतराचा परवाना दिलाच कसा? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
धर्माबाद,बाळापूर,रत्नाळी परिसरातील अनेक तरुण,महिला,बालके शिंदी च्या व्यसनाच्या आहारी गेले आहेत.
त्यातील काही जणांनी नशेतच आत्महत्या केली आहे.परिणामी अनेकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत.
मुळात शिंदी ताडी विक्रेते लोकांना झाडाची शुद्ध निरा न देता शिंदीच्या नावाखाली गुलफार्म,साकरीन,रिठा,युरिया,व उडीद पिठ मिक्स करून नाशिले विष तयार करून विकतात.हे पेय स्वस्त असल्यामुळे,पिण्यास याची चव कडू नसल्याकारणाने त्यात अल्प दरात नशा होते.
कामगार स्त्री-पुरुषांना आपला थकवा दूर झाल्याचा फिल येतो.तर तरुणांना शौक पूर्ण झाल्याचा अल्पकालीन आनंद मिळतो.त्यातून ते या नशेच्या चक्रव्युहात गुरफटत जातो.यातून बाहेर निघण्याचा मार्ग सापडला नाही की लोक वेडसरपणा करून आपले जीवन संपवितात.तरीही केवळ आपल्याला या व्यवसायात अमाफ पैसा कमवितात येतो यासाठी लोकांचे जीव धोक्यात टाकून रत्नाळी येथे शिंदी भट्टी चालू करण्याचा अट्टहास केला आहे.
उत्पादन शुल्क विभागाने नियम धाब्यावर बसवून स्थलांतराला परवानगी दिलीच कशी? या परिसरात यशवंत विद्यालयाचे मुलांचे वसतिगृह आहे तसेच कुंभार समाजाचे संत गोरोबा काकायांचे मंदिर आहे.धर्माबाद ला शाळा व कॉलेजला जाण्यासाठी विध्यार्थी विध्यार्थीनी तरुण तरुणी महिला वर्ग जाण्यासाठी व येण्यासाठी या रस्त्याचा रोज उपयोग करतात हे विशेष असे असताना उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी जाय मोक्यावर जाऊन पाहणी केली का? केली असेल तर परवानगी कशी दिली? ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नगर परिषदेची परवानगी घेतली का? लोकांच्या जिवांशी खेळण्याचे पाप कोण करत आहे? प्रशासन, उत्पादन शुल्क विभाग की शहरातील / गावातील शुक्राचार्य?
रत्नाळी गावातील जागरूक तरुणांमध्ये याविषयीं तीव्र संताप आहे.
गावकऱ्यांनी एकजूटीने या भट्टीस विरोध केला पाहिजे अशी भावना सोशल मीडियातून व्यक्त होत आहे.
*गावात व तालुक्यात नाही झाडी तरी विकली जाणार शिंदी ताडी*
यामुळे लोकांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे.उत्पादन शुल्क विभाग व शिंदी विक्रेता यांच्यात मिलभगत असल्याशिवाय हे शक्य नाही अशी चर्चा गावाकऱ्यात रंगत आहे.
स्थानिक पूढारी,आमदार-खासदार नेमकी काय भूमिका घेतात हे बघणे उत्सुकतेचे असेल.