किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

पक्षाने आदेश दिला तर मी सर्वांना सोबत घेउन लोकसभा निववडणुक लढविण्यास सज्ज आहे.* *रामराव वडकुते हिंगोली लोकसभा निवडणुक प्रभारी.

तालुका प्रतिनिधीः – भारतीय जनता पार्टीचे एकच लक्ष आगामी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपाचे सत्ता आणि भारत महासत्ता होण्यासाठी माननीय नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होण्यासाठी भारतीय जनता पार्टी चे ध्येय असून हिंगोली लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचाच खासदार निवडून आणण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत कुठल्याही क्षणी लोकसभेच्या निवडणुका लागल्या तर आम्ही त्याला सामोरे जाण्यास आम्ही तयार आहोत असे प्रतिपादन हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे निवडणुक प्रभारी मा. रामराव वडकुते यांनी किनवट येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना केले या वेळी आमदार भीमराव केराम भाजपाचे जिल्हा अध्यक्ष सुधाकर भोयर , आदिवासी नेते जितेंन्द्र अ. कुलसंगे भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य ,तालुका अध्यक्ष बालाजी आलेवार प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोकराव नेम्माणीवार जिल्हा संघटक अनिल तिरमनवार यांची उपस्थिती होती.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपाचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे प्रभारी रामराव वडकुते यांनी आज किनवट येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन संपर्क दौरा केल्यानंतर गोकुंदा येथील विश्रामगृहात पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाशी युती राहणार असून समन्वयाने जागा वाटपाचा निर्णय घेतला जाईल यावेळी हिंगोली लोकसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीला सोडण्यासाठी आमची पक्षश्रेष्ठीकडे आग्रही मागणी राहणार असून मीस्वतः व इतरहीआमचे नेते लोकसभेची निवडणूक लढवण्यास उत्सुक असले तरीही पक्षश्रेष्ठी ज्या उमेदवारावर शिक्कामोर्तब करील त्यासाठी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून मी आमचा उमेदवार वाजयी होण्यासाठी परिश्रम घेणार आहो आमची बुथ रचना झाली असून संपूर्ण लोकसभा मतदारसंघात आमच्या जनसंपर्कच्या दोन फेरी पूर्ण झाल्या आहेत भारतीय जनता पार्टीने घराघरात शासनाच्या विविध योजना पोहोचविला असून यापूर्वी एक रुपया पैकी पंधरा पैशाचा लाभार्थीपर्यंत पोहोचल्या जात होते आता मात्र संपूर्ण एक रुपया लाभार्थ्यापर्यंत जात असून यात दलाला थाराच नाही विविध योजनांचा लाभ महिला शेतकरी ,कामगार, यासह समाजाच्या विविध घटकांना केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्षपणे मिळाला आहे भविष्यात भारत महासत्ता होण्यासाठीच आणि तो प्रथम क्रमांकावर निश्चित राहणार आहे अयोध्या राम मंदिराचा संघर्ष 500 वर्षापासून सुरू असून योगायोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात आयोध्या येथील श्री राम मंदिराचे काम पूर्णत्वाला गेले असून त्यात अनेक रामाभक्ताचे बलिदान आणि शौर्य यामुळेच हे राम मंदिर आज पूर्ण होत आहे.

विरोधक नेहमीच मंदिर वही बनायेंगे लेकिन तारीख नही बतायेंगे ही टीका करत होते या टिकेला या निमित्ताने 22 जानेवारी रोजी पूर्णविरामच मिळणार असेल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळातच हे राम मंदिर पूर्ण होत असल्याचा देशवासीयांनाही सार्थ अभिमानच आहे असे सांगून ते पुढे म्हणाले भारतीय जनता पार्टी आणि आमच्या मित्र पक्षात किरकोळ धुसफूस असली तरी याचा आगामी लोकसभा निवडणुकीवर कुठलाही परिणाम होणार नसून मित्र पक्षाच्या समन्वयानेच पुन्हा एकदा माननीय नरेंद्र मोदीच हे निश्चितपणे पंतप्रधान होणार असल्याचेही त्यांनी सांगितले लोकसभा विधानसभा निवडणुका म्हणजेच नेत्यांच्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असून काही तांत्रिक अडचणीमुळे या निवडणुका रखडल्या असल्या तरीही कार्यकर्ते हे नेत्यांच्या निवडणुकीसाठी निश्चितपणे परिश्रम घेऊन भाजपचाच झेंडा पुन्हा एकदा दिल्लीत फडकवतील असा विश्वासही रामराव वडकुते यांनी व्यक्त केला तर आमदार भीमराव केराम यावेळी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले जलजीवन मशीन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनेच्या कामातील अडीअडचणी व व कंत्राटदाराच्या चुकांमुळे काही प्रश्न निर्माण झाले निकृष्ट दर्जाचे काम करणार्‍या एजंशीचे नाव आम्ही काळ्या यादीत टाकले असले तरी त्या चुका सुधारून जलजीवन मीशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेचे किनवट माहुर मतदारसंघातील जल जिवन मिशनचे रखडलेली काम लवकरच पूर्ण केले जाण्यासाठी मी स्वतःच लक्ष देणार असल्याचेही आमदार केराम यांनी सांगितले प्रास्ताविक भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर भोयर यांनी केले तर भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेमानिवार यांनी उपस्थीतांचे आभार मानल यावेळी भाजपाचे मा.तालुका संदीप केंद्रे, आध्यक्ष नगर परिषदेचे माजी अध्यक्ष आनंद मच्छेवार, शिवाजी आंधळे बालाजी धोत्रे ,अंकुश सावळे, धीरज नेम्माणीवार अक्षय भोयर मारुती भरकड दत्ता आडे संतोष कन्नाके पत्रकार प्रणेय कोवे भास्कर आडे शेख अल्लाउद्दीन यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.!

148 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.