1983 पासून लिलावात भाग घेणा-या मच्छीमार समाज बांधवांना डावलल्याने सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; चौकशी न झाल्यात नागझरी तलावात सर्व कुटुंबियांना सोबत घेऊन जल समाधी
किनवट ता.प्रतिनिधी(आनंद भालेराव)
किनवट ता.प्र दि १४ किनवट या आदिवासी नक्षलग्रस्त भागातील पारंपारीक मच्छीमार तरुण आपली उपजिविका भागवना-या समाजाला डावलुन मच्छीमार संस्थेला अंधारात ठेउन शासनाने दिशाभुल करुन सन २०२१ – २२ चा तलावाचा ठेका सन १९८३ पासुन लिलावात भाग घेणा-या मच्छीमार समाज बांधवांना डावलण्यात आल्याने संतप्त समाज बांधवांनी झालेल्या अन्यायाच्या विरोधात आवाज उठवित सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन चौकशीची मागणी केली चौकशी न झाल्यात नागझरी तलावात सर्व कुटुंबियांना सोबत घेऊन जल समाधी घेऊ असा हि इशारा निवेदनात दिला आहे.
किनवट तालुक्यातील गंगासागर आदिवासी मच्छीमार सहकारी संस्था हे नागझरी हे १९८३ पासुन नागझरी तलावाचे लिलावात भाग घेऊन या तलावाचा ठेका घेउन आपला पारंपारीक व्यवसाय मच्छीमार करुन आपली उपजिविका भागवत होते मागील वर्षी जगभरात कोरोनाचे संकट ओढवल्याने तलाव लिलाव प्रक्रीयेत विलंब झाल्याने त्यात ६ महिण्याची मुदतवाढ दिली असतांना संबधित लिलाव दै टाईम्स ऑफ गौरव या मध्ये प्रकाशित केली सदरील पेपर हा किनवट तालुक्यात कोठेही येत नाही त्यामुळे या व्रुत्तापत्रात जाहिरात देण्यामागे शासनाचा हेतु संशयास्पद होता. या सस्थेमध्ये एकून ६२ सदस्य असुन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
शासनाने वत्सलाबाई सुशिक्षित बेकार मच्छीमार सहकारी संस्था मांडवी ता.किनवट यांनी भरणा केला व त्यांना मंजुरी देण्यात आली हा सर्व प्रकार संगणमताचा असावा असा ही आरोप समाज बांधवांनी घेतला आहे. नागझरी मध्यम प्रकल्प तलाव हा आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रात असल्याने येथे विशेष सुट सुध्दा आहे याचाही फायदा शासनाने त्यांना मिळवुन दिला व १९८३ पासुन मच्छीमार करुन पोट भरणा-या कुटुंबियांच्या पोटावर अन्याय केला. झालेल्या अन्यायाच्या विरोधात आज मच्छीमार संघटनेच्यावतीने किनवट येथिल सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांना निवेदन देऊन सहाय्यक आयुक्त नांदेड यांनी आमच्यावर केलेल्या अन्यायाची चौकशी करुन न्याय मिळवुन देण्याची मागणी केली जर असे न केल्यास आमच्यावरी उपासमीच्या संकटामुळे आमच्या सर्व मच्छीमारांना परिवारासह नागझरी येथिल मध्यम प्रकल्पात जलसमाधी घेण्याची तयारी दर्शवली आहे.
निवेदनावर रमेश गिनगुले, विजय बावणे, अक्षय कोल्हे, पवन बावणे, सुनिल कोल्हे, राजु भाऊ शिरपुरे, जगानन मोजे, विक्क्री कोल्हे, पवन बावणे सह ६२ मच्छीमार समाज बांधवांच्या स्वाक्ष-या आहेत या प्रकरणी वरिष्ठ स्तरावरुन चौकशी करुन न्याय मिळावा अशी अपेक्षा सर्व सदस्यांनी व्यक्त केली आहे.
किनवट तालुक्यातील पारंपारीक व्यवसाय पारंपारीक मच्छीमार व्यवसाय करुन आपले व आपल्या कुटुंबियाची उपजिविका भागवणारे समाजाला डावलुन सहाय्यक आयुक्त्य नांदेड कार्यालयातुन झालेल्या गैरप्रकरणाची चौकशी व्हावी अन्यथा मच्छीमार समाज बांधवांना न्याय मिळवुन देण्यासाठी रस्त्यावर उतरु अशा इशारा राष्ट्रवादी क़ॉग्रेस पक्षचे ता अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी दिला आहे.