किनवट येथे मराठा सेवा संघाचा ३३ वा वर्धापन दिन साजरा
किनवट प्रतिनिधी: येथे मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड व ३३ कक्षाच्या वतीने मराठा सेवा संघाचा ३३ वा वर्धापनदिन गोकुंदा येथील शासकीय विश्रामगृहात साजरा करण्यात आला.
प्रारंभी कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे माजी तालुकाध्यक्ष प्रा.उमाकांत इंगोले व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता माँ.साहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व सर्व उपस्थितांना संत विचार हे पुस्तक भेट देण्यात आले.
महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत मराठा सेवा संघाने दिलेले योगदान खूप मोठे आहे.आज मराठा सेवा संघाची स्थापना होवून ३३ वर्षे पूर्ण झाली आहेत.”मराठा तितुका मेळवावा गुणदोषांसह स्वीकारावा” हे ब्रीद घेऊन मराठा सेवा संघाची स्थापना युगनायक अॅड. पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी १ सप्टेंबर १९९० रोजी अकोला येथे केली.असे मत आपल्या प्रास्ताविकातून बोलतांना मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष प्रा दगडू भरकड यांनी व्यक्त केले.
यावेळी मराठा सेवा संघाचे प्रा.नेताजी इंगोले प्रा.जयवंत चव्हाण ,प्रा.संतोष चव्हाण,राजू शिंदे,सुशील कदम संभाजी ब्रिगेडचे बालाजी पाटील सिरसाट,संदीप कोल्हे,शामराव फाळके,अँड.विलास सूर्यवंशी,प्रा. शिवानंद पवार,संदीप इसाई,अँड.विजय कदम आदी उपस्थित होते.