कस्तुरबा वस्तीगृह बनले शोभेची वास्तू! :पद मान्यता नाही,भरती नाही, निकृष्ट बांधकामामुळे छत गळती
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.15.जिल्यातील बिलोली,धर्माबाद,हदगांव,भोकर येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या प्रांगणात राष्ट्रीय सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत कोट्यावधी रुपये खर्चून बांधण्यात आलेले कस्तुरबा गांधी बालिका वसतीगृह आता केवळ शोभेची वस्तू बनली असून सदरील वस्तीगृहाच्या उद्घाटन करून ही आजून सदरील ठिकाणी 9 वी व 10 वी च्या मुलींची राहण्याची व शिक्षणाची सोय व्हावी म्हणून सदरील वास्तू उभारण्यात आली असून शैक्षणिक वर्ष चालू होऊन ही आज परेंत एक ही ऍडमिशन का झाले नाही.असा जाब जनता विचारत आहे.
याबाबत कस्तुरबा गांधी बालिका वस्तीगृहाबाबत सविस्तर माहिती अशी की धर्माबाद,बिलोली शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल परिसरात काही वर्षांपूर्वी कोट्यावधी रुपयाचा निधी खर्च करून कस्तुरबा गांधी बालिका वस्तीगृहाची इमारत उभारण्यात आली आहे.
परंतु वरिष्ठ पातळीवरून येथील अपेक्षित असलेली पदे भरण्यात आलेली नाहीत.किंबहुना अद्यापही पदमान्यताच मिळाली नाही.त्यामुळे मुलींसाठीच्या या वस्तीगृहाचा विद्यार्थ्यांसाठी काहीच उपयोग होत नाही.ही इमारत सध्या तरी केवळ शोभेची वास्तू बनली आहे.
धर्माबाद,बिलोली,परिसरात मुलींसाठी कोणतेही शासकीय वस्तीगृह नसल्यामुळे त्यांच्या राहण्याची जेवण्याची सोय व्हावी म्हणून राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान या योजनेअंतर्गत सुसज्ज इमारत उभी करण्यात आली.सदर इमारतीमध्ये मुलींसाठी पलंग गादी इत्यादी सर्व वस्तू उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
सदर बांधकाम चालू असताना कोणत्याही अधिकाऱ्यांनी व्यवस्थित लक्ष न दिल्याने गुत्तेदाराने थातुर मातुर बांधकाम केलेले लक्षात येत आहे.आत्ताच ही वास्तू गळत आहे.वास्तूच्या अंगणाच्या परिसरात व छतावर पावसाचे पाणी साचत आहे.
सध्या या वास्तूचा ताबा गटशिक्षणाधिकारी कार्यालय यांच्याकडे आहे.त्यांच्याशी संपर्क करून माहिती घेतली असता वरिष्ठ पातळीवरून अजूनही कोणतेही आदेश न आल्यामुळे ही वास्तू विद्यार्थ्यांना वापरासाठी उपलब्ध करून देता येत नाही.
असे गटशिक्षणाधिकारी यांचे मत आहे.गोरगरिबांच्या शिक्षणाच्या बाबतीत जिल्हास्तरीय अधिकारी किती बेजबाबदार आहेत.याचे एक उदाहरण स्पष्टपणे दिसून येत आहे. अधिकारी तालुकास्तरीय अधिकाऱ्यावर जबाबदारी ढकलून मोकळे होतात.
बहुजनांच्या विद्यार्थ्यांना शहरात राहता यावं व त्यांचा वेळ व पैसा दोन्हीची बचत व्हावी,ग्रामीण भागातील मुलींना ह्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी हे वसतिगृह लवकरात लवकर चालू करून या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला ते उपलब्ध करून द्यावे हे अपेक्षित होते.
अशी जनतेची आज घडीलाही तीव्र मागणी आहे.ज्या गुत्तेदारांनी ईमारत बांधली आहे आणि ज्या सार्वजनिक बांधकाम खात्याने अथवा जिल्हा परिषदेने या गुत्तेदाराचे बिल मंजूर केले आहेत.त्यांनी एक वेळ या इमारतीवर उभे राहून साचलेले पाणी पहावे व गळणाऱ्या छताची अर्धवट राहिलेल्या कामांची चौकशी करावी.
अन्यथा परिसरातील नागरिक गुत्तेदाराविरुद्ध उपोषणास बसण्याच्या तयारीत आहेत.
उपरोक्त वसतिगृहात विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याकरिता शासकीय पातळीवर कर्मचाऱ्यांची अद्यापही पदमान्यताच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून असे असताना हा प्रश्न आता जनता विचारत असून हे राजकीय लोकं जनतेची कशी दिशाभूल करतात हे आता निष्पन्न होत असून हळूहळू जनता आता दुसरा पर्याय बघत आहे.
धर्माबाद शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील जनावरांचा शासकीय दवाखाना,जिल्हा परिषद हायस्कूल धर्माबादच्या परिसरातील कस्तुरबा गांधी बालिका वस्तीगृह उद्घाटना विना पडून आहेत तर तहसीलच्या प्रशासकीय इमारतीवरील पंचायत समितीचा पहिला मजला आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे वस्तीगृह यांचे बांधकाम बऱ्याच वर्षापासून अर्धवट आहे. या चारही इमारती नसून वळंबा असून खोळंबा बनल्या आहेत.