प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या कामाची चौकशी करा : चंद्रकांत पाटील होटाळकर
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:मुखेड तालुक्यातील भासवाडी बिहारीपुर येथील प्रधानमंत्री आवास योजनेचा गैरवापर करणाऱ्या लाभार्थ्यास आर्थिक मदत घेऊन सहकार्य करणारे जबाबदार शासकीय अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड व जिल्हाधिकारी,जिल्हा अधिकारी कार्यालय नांदेड यांना देण्यात आले आहे.
मुखेड तालुक्यातील मौजे भासवाडी बिहारीपुर येथील पाच लाभार्थी अशोक सोपानराव सूर्यवंशी (एम एच २६.३९११७- दुसरा हप्ता), सुभाष सोपानराव सूर्यवंशी (एम एच २६.३९११९- तिसरा हप्ता), सोपान यादवराव सुर्यवंशी (एम एच २२.७५०२२. दुसरा हप्ता), रामदास सोपानराव सूर्यवंशी (एमएच २२.७५००२. दुसरा हप्ता), नागनाथ शेषराव सूर्यवंशी (एम एच २६.३९३०३. तिसरा हप्ता) ह्या लोकांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल बांधकामाचे अनुदान प्राप्त झालेले आहे. परंतु ह्या लोकांनी संबंधित जबाबदार अधिकारी गट विकास पंचायत समिती मुखेड ई पंचायत समिती मुखेड ग्रामसेवक यांना हाताशी धरून घरकुलाचे कोणतेही बांधकाम न करता निधी हडप केलेला आहे. सदरील घरकुलाचे बांधकाम न करता शासकीय अधिकारी यांनी लाभधारकांना दुसरा व तिसरा हप्ता कोणत्या आधारावर मंजूर केला? याची कोणतीही माहिती शासनास न देता आर्थिक तडजोड करून सदरील लाभार्थ्यांना आवास योजनेचा गैरवापर केला आहे. आणि ऑनलाईन वर फोटो दुसऱ्याच्या घराचे अपलोड केलेले आहेत. ‘सदरील लाभार्थ्याचे ऑनलाईन लाभ मिळालेल्या प्रति माझ्याकडे असून शासनाने एकीकडे गोरगरीब नागरिकांना त्यांच्या सोयी सुविधेसाठी निवारा देण्याचे ठरविले असून एकीकडे अशा शासकीय कर्मचाऱ्यांनी पळवाटा काढून गरिबांची दिशाभूल करून पैसे हडप करीत आहेत.अशा कर्मचाऱ्यांना धडा शिकविण्यात यावा व असे गैर व्यवहार पुढे कोणतेही शासकीय अधिकारी करू नयेत व शंभर टक्के गोरगरीब जनतेला प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेचा लाभ मिळवून देऊन त्यांना घर बांधकाम करण्यास भाग पाडण्यात यावे.’असे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद,नांदेड व जिल्हाधिकारी,जिल्हाधिकारी कार्यालय,नांदेड यांना देऊन पुढील कारवाई करण्यात यावे, असे भारतीय मराठा महासंघाचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील पवार होटाळकर यांनी केले.उचित कारवाई करून संबंधित जबाबदार अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई न केल्यास येत्या पंधरा दिवसात भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पंचायत समिती मुखेड समोर उपोषण करण्यात येईल. याची नोंद घ्यावी,असा इशारा देण्यात आला आहे.