किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

मंगळवारी (दि.15 ) किनवट तालुक्यातील 3 हजार 382 विद्यार्थी देणार 10 वीची परीक्षा -गट शिक्षणाधिकारी अनिल महामुने

किनवट : तालुक्यातील 11 मूळकेंद्रावर व 56 उपकेंद्रावर 68 शाळेतील 3 हजार 382 विद्यार्थी मंगळवार (दि.15 ) रोजी इयत्ता 10 वीची परीक्षा देणार असून परीक्षा पारदर्शी व सुरळीतपणे होण्याकरिता प्रत्येक केंद्रावर बैठे पथक स्थापन केले असल्याचे गट शिक्षणाधिकारी तथा परिरक्षक अनिल महामुने यांनी सांगितले.
जिल्हा परिषद (मुलांचे) हायस्कूल’ किनवट येथे किनवट तालुक्यासाठी परिरक्षक कार्यालय स्थापित केले असून बोर्डाकडून प्राप्त प्रश्नपत्रिका पोलिस ठाण्याच्या कस्टडीत ठेवण्यात आल्या आहेत. दररोज सकाळी साडेसहा वाजत्या त्या हस्तगत करून परिक्षक कार्यालयात आणल्या जातात. तिथून रणर मार्फत तालुक्यातील 9 मूळ केंद्रावर ( 2 मूळ केंद्रावर हिमायतनगर परिरक्षक कार्यालयातून ) व तिथून रणर मार्फत उपकेंद्रावर प्रश्नपत्रिका पोहचविल्या जातात.
कोविड – 19 प्रादुर्भावाच्या आव्हानात्मक स्थितीत शासनाने यावर्षी ” शाळा तिथे परीक्षा केंद्र ” ठेवले आहेत. सहायक परिरक्षक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड, उत्तम कानिंदे , समशेर खान हे परीक्षा यशस्वीपणे घेण्यासाठी परिश्रम घेताहेत. सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार, तहसीलदार डाॅ. मृणाल जाधव, गट विकास अधिकारी सुभाष धनवे यांचे भरारीपथक व शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांचे बैठे पथक प्रत्येक केंद्रावर कार्यरत आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर , मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर – घुगे व शिक्षणाधिकारी (मा) प्रशांत दिग्रसकर यांच्या मार्गदर्शना खाली कॉपीमुक्त वातावरणात निर्भयपणे , पारदर्शी व सुरळीतपणे पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज आहे.

108 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.