किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

किनवट तालुक्यात 12 वीच्या परीक्षा पारदर्शी व सुरळीतपणे सुरु -गट शिक्षणाधिकारी तथा परिरक्षक अनिल महामुने

किनवट : तालुक्यात चार मूळकेंद्र व 12 उपकेंद्रावर इयत्ता 12 वीच्या रीक्षा पारदर्शी व सुरळीतपणे चालू असल्याचे गट शिक्षणाधिकारी तथा परिरक्षक अनिल महामुने यांनी सांगितले.
परिरक्षक कार्यालय किनवट मधील मूळ केंद्र, केंद्रसचालक (कंसात एकूण परिक्षार्थी ) पुढील प्रमाणे दर्शविली आहे.
बळीराम पाटील कनिष्ठ महाविद्यालय किनवट : प्रा. विजय खुपसे (657), महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा : उपप्राचार्य सुभाष राऊत (783), शासकीय आश्रम शाळा कनिष्ठ महाविद्यालय पाटोदा (खु ) : प्रा. प्रल्‍हाद हेलाले (343) व सुधाकरराव नाईक निवासी उच्च माध्यमिक विद्यालय, पळशीतांडा : प्राचार्य राजेंद्र चौधरी(318)
कोविड – 19 प्रादुर्भावात आव्हानात्मक स्थितीत शासनाने यावर्षी ” शाळा तिथे परीक्षा केंद्र ” ठेवले आहेत. सहायक परिरक्षक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड, उत्तम कानिंदे , समशेर खान हे परिक्षा यशस्वीपणे घेण्यासाठी परिश्रम घेताहेत. सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कीर्तिकिरण एच. पुजार, तहसीलदार डाॅ. मृणाल जाधव, गट विकास अधिकारी सुभाष धनवे यांचे भरारीपथक व शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांचे बैठे पथक प्रत्येक केंद्रावर कार्यरत आहेत.

363 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.