किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

*साहित्य रत्न लोकशाहीर डॉ.अण्णा भाऊ साठे सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळाच्या अध्यक्ष पदी कॉ.गंगाधर गायकवाड यांची बिनविरोध निवड*

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:७ जुलै रोजी सायंकाळी डॉ.अण्णा भाऊ साठे चौक येथील महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिक वर्कर्स फेडेरेशन मंडळ कार्यालयात समाजातील सर्व पक्षीय कार्यकर्ते व पुढाऱ्यांची बैठक जेष्ठ नेते सतीश कावडे यांच्या अध्यक्षेतेखाली संपन्न झाली.अध्यक्ष व जिल्हा कार्यकारणी निवडीसाठी घेण्यात आलेल्या या बैठकीस विविध राजकीय पक्ष संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एक ऑगस्ट रोजी सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळाच्या वतीने नांदेड शहरात आणि जिल्हाभर विविध सामाजिक उपक्रम आणि सांस्कृतीक कार्यक्रम राबविण्यात येत असतात व जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते.सार्वजनिक जिल्हा जयंती मंडळाच्या कार्यकारणीच्या वतीने पुढील एक वर्षाचे नियोजन करून आराखडा तयार केला जातो.त्यामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून पुरस्कार देणे.इयत्ता दहावी व बारावीत विशेष प्राविण्यासह गुण प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार व रोख रकमेचे पारितोषिक देणे. सांस्कृतीक व कला क्षेत्रातील कलाकारांचा सन्मान करणे. गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मदत व शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे. समाजातील दुर्बल घटकावर होणाऱ्या अन्याय अत्याचार प्रकरणात हस्तक्षेप करून वाचा फोडणे व शासन स्तरावर पाठपुरावा करणे.आदीसह परिस्थितीजन्य परिस्थिती नुसार बहुमताने निर्णय घेतले जातात.

या जिल्हा कार्यकारणीस खुप महत्व असते.उपरोक्त संपन्न झालेल्या बैठकीत माकप तालुका सचिव तथा सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (सीटू) कामगार संघटनेचे जिल्हा जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांची अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली.तर सचिव पदी ईश्वर अण्णा जाधव व उपाध्यक्षपदी भारत सरोदे यांची निवड झाली.
बैठकीत गणेश तादलापूरकर, नागोराव आंबटवार, विजय रणखांब,निलेश तादलापूरकर, परमेश्वर बंडेवार,सूर्यकांत तादलापूरकर,प्रवीण (बाळू) खोबरे,सचिन आंबटवार, कॉ.संतोष शिंदे,शिवाजी नुरुंदे,प्रीतम गवाले,प्रदीप वाघमारे,गजानन गायकवाड आदींनी मनोगत व्यक्त केले.तर सूत्रसंचालन दयानंद बसवंते यांनी केले.बैठक यशस्वी करण्यासाठी संयोजक सतीश कावडे, ईश्वर अण्णा जाधव,गणेश तादलापूरकर,भारत खडसे, प्रा.रामचंद्र भरांडे,माजी नगरसेवक प्रकाश मुराळकर,ऍड.बी.एम. गायकवाड,पत्रकार सूर्यकांत तादलापूरकर,बाबू वाघमारे,निलेश तादलापूरकर,माधव डोम्पले, नागोराव आंबटवार,संजय गायकवाड,शिवाजी नुरुंदे,प्रदीप वाघमारे,रोहन वाघमारे, सचिन वाघमारे,संजय गोटमुखे,सुनील मोघेकर,गणेश मोरे,नवनाथ वाकोडे, सोनू वाघमारे,आकाश गवाले,बबलू गायकवाड,गजानन गायकवाड,कॉ.जयराज गायकवाड, गोपीप्रसाद गायकवाड आदींनी योगदान दिले.विस्तारित कार्यकारणी लवकरच घोषित करण्यात येईल आणि १८ जुलै रोजी स्मृतिदिन व १ ऑगस्ट रोजी जयंती सोहळा मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येईल अशी माहिती नव निर्वाचित अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड माजी अध्यक्ष निलेश तादलापूरकर,प्रवीण(बाळू) खोबरे,भारत सरोदे आदींनी दिली आहे.

273 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.