लहुजी शक्ती सेना चे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भाऊ कांबळे यांना लोह्यात श्रध्दांजली अर्पण
लोहा/श.प्र.तुकाराम दाढेल
लोहा,मातंग समाजाच्या विषयावर रोखठोक,प्रखर व अभ्यास पूर्व आपली भूमिका मांडणारे समाजातील लाखों तरुणांचे प्रेरणा स्थान मातंग समाजाचा ढाण्या वाघ म्हणून परिचित असलेले
लहुजी शक्ती सेना संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय लहु श्री. सोमनाथ भाऊ कांबळे यांना नांदेड जिल्हा कमिटी लहुजी शक्ती सेना च्या वतिने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
दिनांक ०४/०५/२०२१ रोजी
आदरणीय लहु श्री. सोमनाथ भाऊ कांबळे यांचे अल्प शहा आजाराने सोलापूर येथे निधन झाले आणि कांबळे परिवार व सबंध मातंग समाजावर दुःखा चा डोंगर कोसळला.सोनाथ भाऊ कांबळे यांनी समाजावर झालेल्या प्रत्येक अन्याय अत्याचारावर नेहमीच आपली व आपल्या संघटनेच्या माध्यमातून प्रखर व झालं भूमिका मांडली व समाजाला न्याय मिळवून दिला. त्यांनी मातंग समाजातील छोट्या छोट्या विषयावर काटेकोर अभ्यास केला अमजातील उणिवा जाणून घेतल्या आणि लहुजी शक्ती सेना या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून समाजाला न्याय मिळवून देण्याचे स्वप्न मनी बाळगून आपले कार्य चालूच ठेवले.त्यांनी त्यांच्या हयातीत मातंग समाज हितासाठी आनेक आंदोलने, उपोषण,मोर्चे काढले आणि वेळोवेळी समाजाला न्याय मिळवून दिला. आण्णा भाऊ साठे यांनी बोलेल वाक्य त्यांच्या मुखात नेहमी असायचं “मला लढा मान्य आहे रडगाणे नाही आणि लढल्या शिवाय समाजाची प्रगती नाही.” शंभर दिवस शेळी होऊन जगण्या पेक्षा एक दिवस वाघ होऊन जगलेलं बर.
आदरणीय लहु श्री.सोमनाथ भाऊ कांबळे यांच्या जाण्याने सबंध मातंग समाज पोरखा झाल्याची भावना समाजातील आनेक नेत्यांनी बोलून दाखवली. त्यांच्या ह्या अचानक जाण्याने समाजाचे खूप मोठे नुकसान झाले आहे हे नाकारता येणार नाही.
यांना नांदेड लहुजी शक्ती सेनेच्या नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने लोहा येथे भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.प्रदिपभाऊ वाघमारे (जिल्हाध्यक्ष नांदेड) यांच्या हस्ते सोमनाथ ( भाऊ ) कांबळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन भावपूर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली. या शोकसभेस संतोष भाऊ सुर्यवंशी (को.क.अध्यक्ष नांदेड जिल्हाध्यक्ष), टि.के.दाढेल सर (युवक जिल्हाध्यक्ष), स्वप्निलभाऊ गव्हाणे (तालुकाध्यक्ष लोहा), दयानंद डुबे,जळबा मोरताटे,सुशिल डुबे,बाबाराव गायकवाड,केशव वाघमारे,रामभाऊ डुबे, माधव लोंढे,यांच्या सह मातंग समाज बाधंवाची उपस्थिती होती.