मा जिल्हाधिकारी यांची मौजे शेवाळा तालुका कळमनुरी येथील मयत गौतम नरवाडे यांच्या कुटुंबाची सात्वनपर भेट
कळमनुरी: आज रोजी मौजे शेवाळा तालुका कळमनुरी जिल्हा हिंगोली येथे दिनांक 01/09/2022 रोजी गौतम नरवाडे यांचा निघ्न खून झाला होता त्यानुसार अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंध नियमान्वये पोलीस स्टेशन आखाडा बाळापुर भुरण 434/2022 मध्ये कलम 302 भादवि सहकलम 3(2)(5) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध नियमावर नियमान्वये खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे त्या अनुषंगाने मा जिल्हाधिकारी हिंगोली श्री जितेंद्र पापळकर यांनी सदरील खून प्रकरणात पीडित श्री राजरत्न गौतम नरवाडे यांच्या घरी भेट दिली व नरवाडे कुटुंबाचे सांत्वन केले आणि शासनद्वारे अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध नियमान्वये तात्काळ मदत म्हणून मा जिल्हाधिकारी यांनी रु 412500/- अर्थसहाय्य तात्काळ मंजूर केले तसेच गुन्हेगारावर कठोर कारवाई करण्यात येईल याबाबत पीडित कुटुंबास आस्वस्थ केले सदर प्रसंगी मा उपविभागीय अधिकारी कळमनुरी श्रीमती क्रांती डोंबे मा तहसीलदार कळमनुरी श्रीमती सुरेखा नांदे मा सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्री एस के मीनगिरे व सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री बोधनपोड हे उपस्थित होते