मातंग समाज अन्याय निवारण समिती च्या राज्य समन्वयकांची दोन दिवसीय आढावा -चिंतन व नियोजन,बैठक मुंबई येथे संपन्न
मुंबई/प्रतिनिधी: संकल्प भवन -सी बी डी बेलापूर नवी मुंबई “येथे दि 03/09/22 व दि 04/09/22रोजी पार पडली .बैठकीसाठी राज्यभरातून सर्व राज्य समन्वयक उपस्थित होते .महामानवांच्या प्रतिमांचे पूजन व मालार्पण करून बैठकीस सुरुवात केली ,त्यानंतर समितीचे राज्य समन्वयक डॉ अंकुश गोतावळे यांची उपनगराध्यक्ष पदी निवड झाल्यामुळे समितीच्या वतीने श्री नरेश वाघमारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला .
बैठकीच्या पहिल्या दिवशी समितीने केलेल्या कामाचा लेखाजोखा मांडण्यात आला ,तसेच समितीमुळे अनेक अत्याचारांच्या प्रकरणामध्ये समाजाला कसा फायदा झाला तसेच पीडितांना न्याय मिळण्यास कशी मदत झाली अशा अनेक प्रकरणावर सविस्तर चर्चा करण्यात आली .समितीला कामे करताना येत असलेल्या अडचणींवर चर्चा करून समितीच्या कामामध्ये सुसूत्रता यावी आणि जबाबदाऱ्यांचे वाटप व्हावे म्हणून सर्व राज्य समन्वयकानी पदाधिकारी नेमण्याची सूचना केली त्यावर सकारात्मक चर्चा होऊन बहुमताने पदाधिकारी नेमण्यात आले .त्यानंतर समितीच्या पुढील वाटचालीसाठीचे नियोजन करण्यात आले .
बैठकीच्या दुसऱ्या दिवशीचे सत्र हे सर्व समाज बांधवांसाठी खुले होते .या सत्रात राज्य समन्वयकांशिवाय मुंबई आणि उपनगरांमधून अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून आपलीही मते मांडली .सत्राच्या सुरुवातीस सर्वाना समितीची नियमावली ,ध्येय ,उद्दिष्ट्ये याची माहिती देण्यात आली .तसेच मातंग समाज अन्याय निवारण समितीच्या कामाबद्दल तसेच कामाच्या पद्धतीबद्दल माहिती देण्यात आली .उपस्थित सर्व समाज बांधवानी समितीच्या कार्याबद्दल अतिशय समाधानकारक प्रतिक्रिया देऊन समिती करीत असलेल्या कामाबद्दल समाजाच्या वतीने आभारही मानले .या खुल्या चर्चासत्रामध्ये प्रामुख्याने मा .शरद जाधव साहेब (निवृत्त कामगार उपायुक्त )श्री सुदाम धुपे साहेब (निवृत्त मुख्याधिकारी )श्री ,स्वप्नील भालेराव (उपसंपादक सकाळ )इंजि .उत्कर्ष भोसीकर ,इंजि .माने ,इंजि .अमित साठे ,श्री मंगेश वडागळे (कलावंत ),श्री जयराम कलवले (व्यावसायिक ),श्री खडसे (पत्रकार )यांनी सहभाग घेऊन आपली मते मांडली आणि भविष्यात समितीला सर्व प्रकारे मदत करण्याचा मानस व्यक्त केला .यानंतर मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व मुद्यांवर अतिशय सखोल चर्चा करून त्यादृष्टीने काम करण्यासाठी नियोजन व कृती आराखडा बनविण्यात आला .सदर चर्चासत्रात समितीच्या वतीने श्री विलास साबळे (बुलढाणा ),डॉ अंकुश गोतावळे (चंद्रपूर ),श्री भास्कर नेटके (पुणे ),श्री टी एस क्षीरसागर (सोलापूर ),श्री माधव गवळी (विरार ),श्री आनंद भालेराव (नांदेड ),श्री विलास शेळके (नाशिक ),श्री नरेश वाघमारे (नवी मुंबई )तसेच सौ जोशीलाताई लोमटे (उस्मानाबाद )यांनी भाग घेऊन आपली भूमिका मांडली .त्यानंतर सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे श्री सुदामजी धुपे साहेब यांचे हस्ते पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले .सोबतच सदर चर्चासत्राचे उत्कृष्ट आयोजन करणारे राज्य समन्वयक श्री नरेश वाघमारे यांचे समितीच्या वतीने पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले .त्यानंतर समितीच्या वतीने सर्व उपस्थितांचे आभार श्री विलास साबळे यांनी व्यक्त केले आणि अध्यक्षांच्या वतीने दोन दिवसीय चर्चासत्र संपल्याचे जाहीर करण्यात आल्याचे राज्य समन्वयक /प्रसिद्धीप्रमुख डॉ अंकुश गोतावळे यांनी सांगितले.
नवनियुक्त पदाधिकारी खलील प्रमाणे-
1)अध्यक्ष -सौ जोशीलाताई लोमटे
2)उपाध्यक्ष -श्री आनंद भालेराव
3)कार्याध्यक्ष -श्री विलास शेळके
4)महासचिव -श्री प्रल्हाद गरडे
5)संघटक -श्री माधव गवळी
6)सल्लागार -ऍड. प्रशांत कोंगे
7)प्रवक्ते -विलास साबळे
8)प्रसिद्धी प्रमुख-डॉ. अंकुश गोतावळे