जलनायक सुधाकररावजी नाईक यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ विनम्र अभिवादन
स्मुर्ती विशेष लेख
” दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती “
महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांचे नाव अभिमानाने घ्यावेत असा चाणाक्ष, खुमासदार, बौद्धिक कौशल्य,दिव्य दृष्टी लाभलेला नेता म्हणजे जलनायक सुधाकररावजी नाईक साहेब हे होत.
जलनायकांचे राजकीयच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, शेतीविषयक कार्य आभाळाच्या तोडीचे उत्तुंग असे आहेत.
शिकारी राजे विशाल दृष्टे व तळागाळातील सर्व सामान्यांची जाण असणारे जाणते होते. गोर गरीब, शेतकरी ,वंचित, उपेक्षितांचे आसवे पुसणारे कनवाळू राजे होते.
या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये त्यांनी अनेक जन कल्याणकारी योजना राबविल्या. त्या सर्व जन कल्याणकारी योजना आजही तमाम महाराष्ट्राच्या साक्षीला आहेत.
आज या जलनायकाचा एकविसावा स्मृती दिवस , विदर्भातील गहूंली तांड्याचा सरपंच ते थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ,हिमाचलचे राज्यपाल त्यांच्या उत्तुंग अशा गगन भरारीच्या आठवणींने आपोआपच मस्तक नत होत. असा दिव्यत्वाची प्रचिती लाभलेला जाणता राजा पुनः होणे नाही. त्यांना कोटी कोटी विनम्र आदरांजली व अभिवादन
*****************************
डाॅ. वसंत भा. राठोड, मांडवी किनवट.
मो. 9420315409, 8411919665.
*************************************