मातंग बहुजन समाजाच्या विविध प्रश्नावर लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे मराठवाडा अध्यक्ष माननीय गणपत कांबळे यांचे सरणावर बसून आजपासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू.
जालना:मातंग बहुजन समाजाच्या विविध प्रश्नावर लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे मराठवाडा अध्यक्ष माननीय गणपत कांबळे यांचे सरणावर बसून आजपासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
१) पुणे येथे लहुजी साळवे यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्यात यावे. २) मातंग समाजाला अबकड वर्गीकरण करून आरक्षण द्यावे.३) बार्टी च्या धर्तीवर मातंग समाजासाठी आरटी ची स्थापना करण्यात यावी.४)महाराष्ट्रात मातंग समाज व दलित समाजावर होणारे अन्याय अत्याचार थांबवावेत.५) खादी ग्राम उद्योग व जिल्हा उद्योग केंद्र तसेच अण्णाभाऊ साठे महामंडळात 35 %सबसिडी देण्यात यावी.६) लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त 14 नोव्हेंबर व अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मदिनी एक ऑगस्ट रोजी सार्वजनिक सुट्टी जाहिर करावी.७) साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व क्रांतिवीर लहुजी साळवे यांचे यांना मरणोत्तर “भारतरत्न” पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे.८) यांचे पुतळे संसद भवन येथे उभारण्यात यावे या व अन्य मागण्या सह मातंग बहुजन समाजाच्या विविध प्रश्नावर लहुजी साळवे बहुजन क्रांती सेनेचे मराठवाडा अध्यक्ष माननीय गणपतराव कांबळे यांचे सरणावर बसून आजपासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू झाले आहे सदरील प्रकरणांकडे शासन किती गांभिर्याने पाहाते. हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे..