*आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था महाराष्ट्र शाखा पांगरी (अ) ता.जि.नांदेड येथे हभप भगवतीताई सातारकर व मान्यवरांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण*
*नांदेड
नांदेड शहरात पासुन जवळच असलेल्या पांगरी (अ) ता.जि.नांदेड येथे आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्था पांगरी शाखा बोर्डाचे अनावरण सोहळ्यासाठी वैकुंठवासी गुरुवर्य बाबा महाराज सातारकर यांची सुकन्या ह भ प भगवती ताई सातारकर विशेष उपस्थिती लाभणार आहे. तसेच या कार्यक्रमासाठी धर्माबाद येथील सुप्रसिध्द उद्योजक श्री
भास्कररेड्डी चाकरोड, नांदेड येथील प्रसिद्ध व्यावसायिक श्री नारायणराव जोशी, माहेश्वरी जनरल स्टोअर चे मालक श्री सुनिल शेठ करवा,आम्ही वारकरी परिवार सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राम महाराज पांगरेकर,मार्गदर्शक रावसाहेब पा. शिराळे, संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव माळकौठेकर, सहसचिव प्रभाकरराव पा. पुयड कोषाध्यक्ष शिवाजी मदमवाड,जिल्हाप्रसिध्दि प्रमुख चंपतराव डाकोरे पा. श्री प्रवीण रौतुलवाड, श्री गुलाबराव पा.उबाळे, श्री भगवान पा. रहाटीकर,श्री बालाजी पवार,महिला अध्यक्षा अनिताताई पतंगे,तालुकाध्यक्ष श्री विश्वनाथ बंडे,उपाध्यक्ष श्री अनिल देशमुख,सचिव श्री धनंजय जाधव,कोशाध्यक्ष श्री गजानन कोरडे,सदस्य:- श्री काळबा मोकमपल्ले,श्री मोहन पा.पवार,श्री पुंडलिक पा.भारसावडे,श्री संतोष पा.गिरडे,श्री साईनाथ चटपिल्ले व इतर सदस्य यांच्या ऊपस्थितीत दि.१६ मार्च २०२३ सकाळी १० वाजता आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा:-
सकाळी:-१० ते १०.३० हभप वारकरीभुषण भगवतीताई सातारकर यांचा ‘माऊली’ निवास पांगरी येथे दर्शन सोहळा..
सकाळी १०.३० वाजता वरील
मान्यवरांच्या हस्ते नाम फलकाचे अनावरण.सकाळी:१०.३० ते ११.४५ पर्यंत दीपप्रज्वलन, प्रतिमा पूजन व मान्यवरांचा सत्कार,१०.४५ ते ११.१५ पर्यंत
हभप भगवतीताई सातारकर यांचे प्रवचन,११.१५ ते
उपस्थित मान्यवरांचे मनोगत..
तालुक्यातील सर्व आघाडीतील कार्यकारणी व शाखा कार्यकारणी पदाधिकारी याना नियुक्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाचे आयोजक श्री गंगाराम पांगरेकर यांनी केले असून त्यांनी सदर कार्यक्रमास सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखाध्यक्ष श्री पुंडलीक पा. घोगरे,उपाध्यक्ष श्री बालाजी पा. घोगरे,सचिव श्री तिरुपती पुल्लेवार कोषाध्यक्ष श्री अजय सौराते सदस्य श्री शंकर लच्चेवार,श्री कृष्णा घोगरे,श्री गणेश मंडोजवार व महिला आघाडी च्यावतीने परिश्रम घेतले जात आहेत .या कार्यक्रमाचे पत्रक जिल्हाप्रसिध्दी प्रमुख चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिले आहे.