किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

राजस्थानच्या कामगार व्यक्तीचा खून;कुंडलवाडी- धर्माबाद रोडवर सापडला पुरलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह ; वडिलांचे मृतदेह सापडले ; मुलाचा शोध सुरू!

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.1.जिल्यातील बिलोली तालुक्या मधील कुंडलवाडी येथील पोलिस स्टेशन अंतर्गत असलेल्या मौजे हुंनगुंदा येथे हरभरा पिकाच्या काढण्यासाठी आलेल्या राजस्थान येथील एका कामगार व्यक्तीचा खून करून त्याचा मृतदेह कुंडलवाडी-धर्माबाद रोडवर पुरण्यात आले होते,पुरलेले मृतदेह दिनांक 1 मार्च रोजी बाहेर काढण्यात आले आहे.

कुंडलवाडी पासून चार किमी अंतरावर असलेल्या मौजे हुंनगुंदा येथे दरवर्षी हरभरा पिकाच्या काढणीसाठी परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात येत असतात, त्याच अनुषंगाने रशिदखा हासना वय 45 वर्ष व त्याचा मुलगा अमजद खान रशीद वय 17 वर्षे दोघेही राहणार भैसरावत तालुका बोईंनगड जिल्हा अलवर राज्य राज्यस्थान हे हुंनगुंदा शिवारात हरभरा पिकाच्या काढणीसाठी इसकॉटर कंपनीचा ट्रॅक्टर व व हालर क्रमांक RJ 05 RD2674 व सोबत हिरोहोंडा मोटरसायकल क्रमांक RJ 02HS 8369 घेऊन आले होते.

त्यांच्यासोबत प्रमोद रमेश,बंटी निजाम सलामे, विनोद चिनू सलामे, रोशन बबलू सलामे, मानसिक डोमा, सर्व राहणार पलासपाणी तालुका भीमपूर जिल्हा बैतूल राज्य मध्यप्रदेश काम करीत होते,पण दिनांक 21 फेब्रुवारी पासून रशिदखा हासना व त्याचा मुलगा अमजद खान रशीद खा हे दोघे पितापुत्र बेपत्ता झाले होते. दिनांक 21 रोजी रात्री जेवनावरून व मजुरीच्या पैशावरून वरून वरील पाच व्यक्तीने वाद घालून घातपात जीव घेण्याच्या उद्देशाने त्यांचे अपहरण केल्याची फिर्याद रूद्रारखा झडमलखा वय 50 वर्ष राहणार भैसरावत तालुका बोईनगड जिल्हा अलवर राज्य राज्यस्थान यांनी दिनांक 26 फेब्रुवारी रोजी पोलीस स्टेशन कुंडलवाडी येथे दिली होती.त्या फिर्यादीवरून प्रमोद रमेश,बंटी निजाम सलामे, विनोद चिंनू सलामे,रोशन बबलू सलामे, मानसिक डोमा याच्या विरुद्ध गुरन 25/22 कलम 364, 34 भादवी प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड व त्यांची टीम यांनी या पाच आरोपीची कसून तपासणी केली असता,रशिदखा हासना वय 45 वर्ष यांचा खून करुन त्यांचे मृतदेह कुंडलवाडी – धर्माबाद रोडवर पुरल्याचे आरोपीने सांगितले.

त्यानंतर पोलीस प्रशासनाने प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन दिनांक 1 मार्च रोजी पुरलेले मृतदेह बाहेर काढून मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर 17 वर्षीय मुलाचा शोध चालू असून मुलाचाही घातपात झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.वरील पाच ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.

यावेळी घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रांत गायकवाड,पोलीस निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक करीमखान पठाण,उपनिरीक्षक विशाल सूर्यवंशी,वैद्यकीय अधिकारी डॉ.बालाजी सातमवाड,डॉ.विनोद माहुरे, आदीसह मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

391 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.