किनवट ते श्रीक्षेत्र माहूर गडावर जय श्रीराम पदयात्रेचे नियोजन – नगराध्यक्ष आनंद मच्छेवार
किनवट = (तालुका प्रतिनीधी) किनवट ते श्रीक्षेञ माहुरगड अशी पदयाञा मंगळवार दि. ११ आक्टोबर रोजी सकाळी पाच वाजता गजानन महाराज मंदिरा समोरुन वेदमूर्ती दिनेश महाराज कुलकर्णी संभाजीनगरकर यांच्या मार्गदर्शनाखाली जय श्रीराम पदयाञा संयोजन समीतीच्या वतीने आयोजीत करण्यात आली आहे. अशी माहीती नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी दिली आहे. प्रतिवर्षा प्रमाणे यावर्षी ही आश्वीन वद्य द्वितीया मंगळवार दि. ११ आक्टोबर रोजी सकाळी पाच वाजता श्रीफळ वाढवुन या पदयाञेला प्रारंभ होणार आहे. शहरातुन भव्य मिरवणुक काढून घोटी, राजगड, निचपूर, वानोळा, दत्तमांजरी मार्गे राञी दहा वाजता ही पदयाञा दत्तशीखर येथे पोहचणार आहे. १२ आक्टोबर रोजी सकाळी सात वाजता दत्त प्रभुचे दर्शन शीखर संस्थांनचे महंत महाराज यांची पाद्दपूजा दर्शनानंतर सकाळी दहा वाजता ही पद याञा रेणुका माता मंदीर पोहचून मातेची महाआरती व प्रसादानंतर ही पदयाञा किनटला परतीच्या प्रवासाला निघणार आहे “कलौ चंडी विनायको” या शास्ञा प्रमाणे कली युगात चंडी उपासना व पदयाञा फलद्रुप होते. यातुन रेणुका मातेची उपासना होते. या उद्देशाने या पद याञेचे आयोजन करण्यात आले आहे. देव धर्म अन देश याचे संरक्षण व्हावे तरुण पिढी व्यसना पासुन दूर रहावी यासाठी या पद याञेत युवकांंनी अन महीला भगीणी, पुरुष बांधवानी पद याञेचा आनंद घेण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहण श्रीराम पद याञा समितीने केला आहे.