किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

माहूर येथील पत्रकारावर दाखल झालेला गुन्हाची चौकशी करुन तो परत घ्यावा; प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची मागणी! तहसीलदारांना निवेदन!

किनवट:- माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात डॉक्टर हजर राहत नसल्याने दिनांक ३० सप्टेंबर रोजी “माहूर ग्रामीण रुग्णालय सलाईनवर” व दिनाक ३ ऑक्टोंबर रोजी ग्रामीण रुग्णालयात “आरोग्य सेवेची ऐसी तैसी” या मथळ्याखाली खाली बातमी प्रकाशित करण्यात आली होती.याचा राग धरून ग्रामीण रुग्णालयात कंत्राटी डॉक्टर म्हणून कार्यरत असलेले डॉ.निरंजन केशवे यांनी माहूर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने माहूर च्या पुण्यनगरीचे प्रतिनिधी सरफराज दोसानी यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला.याच्या निषेधार्थ आज दिनांक ११आक्टो. रोजी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने तहसीलदार मृणाल जाधव यांची भेट घेऊन माहूर येथील घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला. व योग्य चौकशी करून न्याय मिळवून देण्याची विनंती केली.
पत्रकारावर गंभीर गुन्हे दाखल करून लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला आहे.हा प्रकार पत्रकारांच्या लेखणी वर गंडांतर आणणारा असून लोकहितार्थ बातमी प्रकाशित करणाऱ्या माध्यमांच्या प्रतिनिधी ची मुस्कट दाबी करणारा आहे.
याप्रसंगी आशिष शेळके,राजेश पाटील,आनंद भालेराव,विशाल गिमेकर,शेख अतिफ, नसीर तगाले,सय्यद नदीम,प्रणय कोवे,मारोती देवकते,रमेश परचाके उपस्थित होते.तर ज्येष्ठ पत्रकार मिलिंद सर्पे,मलिक चौहान,कामराज माडपेल्लीवार,दुर्गादास राठोड, विवेक ओंकार यांनी अन्य एका निवेदाद्वारे तहसिलदार यांना घटनेची पार्श्वभूमी समजून सांगत हा पत्रकारांच्या मूलभूत हक्कावर गडा आणणारा प्रकार असल्याचे सांगितले आहे.

187 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.