KINWAT | भारत जोडो युवा अकादमी तर्फे एकल पालकांच्या मुलींना शिक्षण सहाय्य निधीचे वाटप
किनवट/प्रतिनिधी: आज दिनांक 18 मार्च 2022 रोजी भारत जोडो युवा अकादमी, साने गुरुजी रूग्णालय किनवट येथे ज्या मुलीच्या आई वडीलांपैकी एकच पालक असणाऱ्यांसाठी नविन उपक्रम सुरू करण्यात आले आहे. या वर्षी एकुण 22 मुलींना प्रत्येकी 5000 रूपये असे एकुण 1 लाख 10 हजार रूपयांची मदत करण्यात आली आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहूणे नांदेड जिल्हा उद्योजकता विकास, रोजगार व प्रशिक्षण कार्यालयाच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांच्या हस्ते ह्या मुलींना धनादेशाचे वाटप करण्यात आले. या वेळी बोलतांना त्या म्हणाल्या की, मनापासून शिकु इच्छिणाऱ्या पण परिस्थीतीची अडचण असणाऱ्या मुलींना हे सहाय्य त्यांच्या शिक्षणाच्या अडचणी दूर होण्यास मदतगार ठरेल व हा नविन उपक्रम व संकल्पना सुरू केल्याबद्दल त्यांनी डॉ. अशोक बेलखोडे यांचे कौतुक केले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड . मिलींद सर्पे हे होते, तर डॉ. शिवाजी गायकवाड, डॉ. संदीप देशपांडे मानसोपचारतज्ञ नांदेड, श्री. वसंत राठोड, श्री. ज्ञानेश्वर उईके, डॉ. अशोक मुंडे, सौ. वंदना उईके, सौ. व्यवहारे मॅडम, डॉ. शिवानी बेलखोडे, यांच्यासह साने गुरूजी रूग्णालयातील सर्व कर्मचारी यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. डॉ. सुनिल व्यवहारे यांनी केले तर डॉ. अशोक बेलखोडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.