शेर- ए पंजाब महाराजा रणजितसिंघजी यांच्या जयंती निमित्त संचखड गुरुद्वारा साहिब येथे अखंड पाठ व्याख्यानेचे आयोजन
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.२३. रोजी गुरुव्दारा साहिब बोर्ड नांदेड व निष्काम सेवा प्रतिष्ठानच्या वतीने सचखंड गुरुव्दारा साहिब येथे अखंड पाठ साहेबाचे अरंभ करण्यात आले आहे.
निष्काम सेवा प्रतिष्ठानच्या वतीने मागिल तिन वर्षापासून शेरे ए पंजाब महाराजा रणजितसिंघजी यांची जयंती साजरी करण्यात येत आहे.सचखंड गुरुव्दारा साहिब नांदेडचे सेवा सुवर्ण मंदिर अमृतसरचे सोन्याची सेवा तसेच काशी विश्वेश्वर मंदिराचे सोनेरी कळस ची सेवा महाराजा रणजितसिंघजी केली आहे.
एक महान शासक म्हणून त्यांना
इतिहासात स्थान आहे.सर्व धर्माचे धर्मनिरपेक्षक शासन चालविते त्याचा कारकिर्दीत साक्षरता अभियान राबविण्यात आले.त्याच्या कारकिर्दीत कोणसही मृत्यूदंडाची शिक्षा देण्यात आली नाही.
त्याच्या कारकिर्दीत जाती दंगली घडल्या नाहींत.जमू काश्मीर ते अफगाणिस्तान असे मोठे राज्य त्यांनी स्थापन केले त्यांनी अनेक लाढाया न लढता कौशल्याने जिंकल्या आहेत. त्याच्या हयातीत इंग्रजांना कधीही विजय मिळवता आले नाही.त्याचे सैन्य व राज्य इंग्रजाचा पुढे होते. त्याचा व्यापार, विदेश निती इत्यादी अतिशय प्रगत होत्या त्याच्या गुरू घर या सेवेमुळे शीखपंत त्यांना स्थान प्राप्त आहे.
या प्रसंगी निष्काम सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजकमलसिंघ गाडिवाले, अर्जुनसिंघ मुनीम,गुरुप्रसाद कौर,हरबससिंघ वासरीकर,इंद्रजितसिंघ गडगज,जगजिवनसिंघ रिसाळसर,दिलीपसिंघ रागी, हुकूमसिंघ कारागीर, गुरसागरसिंघ सुखमणी, सुरजीतसिंघ तबेलेवाले, हरफलसिंघ ठेकेदार,किशनराव रावणगांवकर जिल्हामहासचिव ,नांदेड जिल्हा कॉग्रेस (सामाजिक न्याय विभाग) अवांतरसिंघ गल्लीवाले, खेमसिंघ पुजारी,राजेंद्रसिंघ पुजारी माजी सदस्य गुरुव्दारा बोर्ड, इतर नागरिक व शीख बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
निष्काम सेवा प्रतिष्ठानच्या वतीने पुज्यनिय पचप्यारे साहिब गुरुव्दारा बोर्डाचे प्रशासक स.विजय सतबीरसिंघ (IAS) अधिक्षक स.ठाणसिंघ बुंगाई, स.आर डी.सिंघ अधिक्षक तसेच सर्व कर्मचारी
यांचे आभार राजकमलसिंघ गाडिवाले निष्काम सेवा प्रतिष्ठानच्या वतीने मानले आहे.
अखंड पाठ साहिबाची समाप्ती दिनांक २३/११/२०२३ रोजी सकाळी ठिक ८-३० वाजता होणार आहे. तसेच व्याख्यान साय. ४-०० वा गोलक हॉल लंगर हॉलवर गुरुव्दारा परिसर सचखंड येथे संपन्न होणार आहे.
यांच बरोबर निष्काम सेवा प्रतिष्ठानच्या वतीने नाशिक येथे महाराणी जिंदकौर , महाराजा रणजितसिंघजी यांचे स्मारक उभे राहणे बाबत पाठ पुरावा चालू आहे.असे निष्काम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राजकमलसिंघ गाडिवाले कळवतात.