खासदार हेमंत पाटील यांनी केली केली माहूर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी तातडीने मदत देण्याचे प्रशासनाला दिले आदेश
नांदेड, दि.२७ (प्रतिनिधी) ः माहूर तालुक्यात मागील दोन दिवसापासून आवकाळी पाऊस, वादळीवारा आणि गारपीटीने शेतीसह घरे आणि जानावरे दगावून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. गुरुवारी (दि.२७) हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान देण्याचे प्रशासनास आदेश दिले.
यावेळी त्यांनी माहूर तालुक्यातील रुई, सातघरी, शेकापूर, लांजी, टाकळी या गावांना भेटी दिल्या व ५० लोकांची वस्ती असलेल्या सातघरी या गावास सिमेंट रस्त्याच्या कामास स्थानिक निधितून तातडीने १० लाख रुपयांचा निधी मंजुर केला. माहूर तालुक्यातील जवळपास सर्वच गावातील रब्बी पिकांचे अवकाळी पावसाने व गारपिट झाल्याने मोठ्या प्रमाणावर उभ्या पिकांची नासाडी झाली आहे. यात प्रमुख्याने मका, तीळ, ज्वारी, गहू, केळी, प्रयोगशील शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्वावर लावलेल्या नागेलिच्या पानमळ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
गावीत घरांवील टीनची पत्रे उडुन घरांची पडझड झाली. पन्नास लोकांची वस्ती असलेल्या सातघरी या गावात गारांचा पाऊस झाल्याने सोनुबाई नंदू पवार (वय ६५) यांचा यात मृत्यू झाला आहे. त्यांना देखील शासनाच्या नैसर्गिक अपत्ती निधितून मदत देण्याचे नांदेड जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना भ्रमणध्वनीवरुन सुचना दिल्या. लखमापूर तांडा, लिंबायत या गावात विजा आणि गारपिटीने जनावरे दगावली आहेत. या गावात देखील जनावरांना नैसर्गिक अपत्ती व्यवस्थापनातून तातडीने शेतकऱ्यांना मदत देण्याच्या खासदार हेमंत पाटील यांनी प्रशासनातील अधिकारी यांना सुचना दिल्या.
यावेळी भाजपचे धरमसिंग राठोड, शिवसेनेचे हनुमंत मुंडे, संजय जोशी, विकास कपाटे, सोनु पाटील, ज्ञानेश्वर गुजलवाड, सरपंच मारोती रेकुलवार, निळकंठ मस्के, संतोष दुबे,गजानन जाधव, तान्हाजी पवार, आकाश जादव, उदय मरमट, युवराज राठोड, बालाजी कोंडे, सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले, तहसिलदार किशोर यादव, मुख्याधिकारी राजकुमार राठोड, गटविकास अधिकारी सुरेश कांबळे, कृषी विभागाचे अमित पवार, विनोद कदम, मंडळअधिकारी, तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आणि जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड यांची उपस्थिती होती.