पशु वैद्यकीय विभागाचा हलगर्जीपणा लोहा तालुक्यात लम्पी आजाराचा शिरकाव* *पारडी येथील शेतकऱ्यांचे बैल लम्पी आजाराने दगावले
*जिल्ह्यात घरोघरी जाऊन जनावरान लस देऊनही आजार बाळावला*
*जनावराणा देण्यात आलेले लंपी आजाराचे औषधचं बोगस?*
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.2.लोहा तालुक्यात पावसाळा सुरू झाला की जनावरांना विविध प्रकारचे आजार होतात यावर उपाय म्हणून पशुसंवर्धन विभागाच्या पशु वैद्यकीय विभागाच्या वतीने जनावरांना साथीचा आजार होऊ नये म्हणून लसीकरण केले जाते परंतु लोहा तालुक्यातील पशु वैद्यकीय विभागाने तालुक्यात लसीकरण मोहीम राबविली नाही पशु वैद्यकीय विभागाच्या हलगर्जीपणा मुळे तालुक्यात लम्पी आजाराने शिरकाव केला असून या आजाराने पारडी येथील त्र्यंबक मटके या शेतकऱ्यांचे सत्तर हजार किंमतिचा बैल दगावला आहे लम्पी आजाराने तालुक्यात शिरकाव केल्याने पशु पालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शेतकऱ्यांना आपल्या जनावरांची काळजी घ्यावी लागणार आहे.
लम्पी चर्मरोग हा साथी चा आजार आहे आणि तो प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने अनेक शेतकरी पशुपालक घाबरले आहेत.
लम्पी आजाराची दुसरी लाट आली असून नांदेड जिल्हा हा लम्पी बाधीत क्षेत्र म्हणून प्रशासनाच्या वतीने घोषित करण्यात आले आहे.लम्पी चर्मरोग आजाराच्या प्रादुर्भावामुळे लम्पीचे विषाणू संक्रमण होऊ नये यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे या करिता प्रतिबंधक लस गोट पॉक्स निःशुल्क लसीकरण मोहिम राबविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे परंतु लोहा लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली नाही.
यामुळे तालुक्यात लम्पी आजाराने शिरकाव केला आहे तालुक्यात पशुवैद्यकीय रुग्णालय जवळपास बारा च्या वर आहेत असे असतांना या रुग्णालयातील पशुवैद्यकीय अधिकारी हे आपल्या भागातील जनावरांना वेळेवर लसीकरण करीत नाहीत हूं सर्व रुग्णालय कुचकामी ठरली जात आहेत मोफत उपचार तर शेतकऱ्यांच्या जनावरांना मिळत नाही एखाद्या शेतकऱ्यांचे जनावर बिमार झाले तर त्यांना शासनाच्या पशु वैद्यकीय रुग्णालयाकडून उपचार मिळत नाही तर तो खाजगी पशु अधिकाऱ्यांकडून घ्यावे लागते
पशु वैद्यकीय अधिकारी यांच्या आशीर्वादाने खाजगी डाँकटर हे ग्रामीण भागात जाऊन जनावरांची तपासणी करतात त्यांच्या वर उपचार करतात आणि शासकीय पशु वैद्यकीय अधिकारी हे फुकट वेतन उचलतात एवढेच नव्हे तर खाजगी डाँकटर यांना शासकीय रुग्णालयातील औषध पुरवठा करतात शासनाच्या औषध गोळ्यावर हे खाजगी डाकटर शेतकऱ्यांना लुटण्याचे काम करीत आहेत.
पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेळेवर लसीकरण केले नाही तर लम्पी आजार तालुक्यात फोपावणार आहे यासाठी प्रशासनाने काळजी घेणे गरजेचे आहे