खासदारांनी गलीत न फिरता दिल्लीत बसून निधी खेचून आणून फिराव;अशोक चव्हाण च्या कठीण काळात अमर ने साथ दिली- खतगावकर
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि 23.जिल्हायाच्या खासदारांना नायगांव शहरासह तालुक्याला निधी देता आला नाही.त्यांना *आता गलीत न फिरता दिल्लीत बसुन निधी खेचून आनावा लागतो* हे कळले पाहीजे.त्यामुळे भाजपला आपण पाडण्याची गरज नाही त्यांच्या पोकळ आश्वासनाने ते येण्या-या निवडणूकीत तेच पडतील आसा विश्वास माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर यांनी व्यक्त केला आहे.
नायगांव तालुक्यातील सरपंच, उपसरपंच याच्या सन्मान सोहळ्यात रक्तदान शिबीरा निमित्त ते अध्यक्षिय भाषणात खतगावकर बोलत होते,या वेळी कार्यक्रमाला,आमदार आमरनाथ राजुरकर,आमदार मोहन हांबर्डे, आमदार जितेश आंतापुरकर, माजी आमदार वसंतराव चव्हाण, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा,नगरअध्यक्ष गिता जाधव,जिल्हा परिषद सदस्य मिनलताई खतगावकर,सभापती संजय बेळगे,जिल्हापरिषद माजी अध्यक्ष रावसाहेब मोरे , उपनगराध्यक्ष विजय चव्हाण, पंचायत समितीचे उपसभापती संजय शेळगांवकर,माधवअप्पा बेळगे,प्रा.रविंद्र चव्हाण, हणमंतराव चव्हाण,मोहन धुपेकर,श्रीनिवास पाटील चव्हाण,डाॅ विश्वास चव्हाण,सुधाकर शिंदे, श्रीधर चव्हाण,पप्पु कांडेकर,रवि खतगावकर,मधुकर राठोड, प्रा.मनोहर पवार,संभाजी भिलवंडे, डाॅ.शिवाजी कागडे , बालाजी मद्देवाड,बाबुराव आडकीने,
पुढे बोलताना खतगावकर म्हणाले नांदेड ते बिदर रेल्वेमार्ग मंजूर करण्यासाठी कै.सुधाकराव डोईफोडे आणि मी स्वतः आंदोलन केली पण आता उठ सुठ भाजपवाले श्रेय घेण्यासाठी जाहीरात बाजी करत आहेत आसा टोला खासदार प्रतापराव पाटिल चिखलीकर याना लगावला.राजकारण कराव पण वैयक्तिक द्वेषातून नाही विकासाच्या मुदयावर असाव.खा.प्रतापराव चिखलीकर यांनी कीती प्रयत्न केले तरी नामदार अशोक चव्हाण यांची बरोबर ते करू शकत नाही.
असेही यावेळी म्हणले.राज्याचे मुख्य मंत्री उद्धव ठाकरे खुप संयमी आणि विकासाची जान आसलेले नेत्रृत्व आहे आम्ही तर म्हणतोच पण जनता त्याना पंसत करते.म्हणून येणा-या काळात जनताच भाजपला पाडेल आसा दृड विश्वास माजी मंत्री भास्करराव खतगावकर यांनी व्यक्त केला.त्याच बरोबर कठीण काळात अशोक चव्हाण यांची आम्ही सात सोडली पण आमदार आमरनाथ राजुरकर यांनी सोडली नाही हे म्हणून आमदार अमरनाथ राजुरकराचे दिवस चांगले आहेत हे सांगायला ही ते विसरले नाहीत.
या वेळी आमदार अमरनाथ राजुरकर,आमदार मोहन हांबर्डे, आमदार जितेश आंतापुरकर,माजी आमदार वसंतराव चव्हाण,प्रा मनोहर पवार आदीची भाषण झाली या वेळी सर्वच मान्यवरांनी नायगांव नगरपंचायतीत काॅग्रेस चे 17 पैकी 17 नगरसेवक निवडून आणल्या बद्दल वंसतराव चव्हाण यांचे कौतुक केले.महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड काळात जनतेला रक्तदान करण्याचे आव्हान केले होते.त्या आव्हानानुसार नायगांव शहरात श्रीनिवास पाटील चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील भव्य असे महारक्तदान शिबिर घेण्यात आले होते.सर्व नगरसेवक मित्रमंडळाचे कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी केला आहे .
-चौकट-
*चव्हाण च्या कठीण काळात आमर ची साथ होती*
शंकरराव चव्हाण यांच्या कठीण काळात आम्ही सोबत होतो
पण नामदार अशोक चव्हाण याच्या कठीण काळात आम्ही सोबत नव्हतो पण अमरनाथ राजुरकर यांनी स्वतः मध्ये सुधारणा करत अशोक चव्हाण यांना साथ दिली त्यामुळे अमर चे दिवस चांगले आहेत.त्यामुळे अशोक चव्हाण यांना राज्याची मोठी जबादारी येणा-या काळात मिळेल त्यासाठी सर्वानी पुन्हा एकदा एकजुठीने अशोक चव्हाण याच्या पाठी माघे खंबीरपणे उभा राहीले पाहीजे असे ही आव्हान खतगावकर यांनी केले.नांदेड चे चव्हाण आणि नायगांव चे चव्हाण एकत्र आले ही एक जमेची बाजु आसुन नायगांव चे चव्हाण हे लोकशाही आस्तीतत्वात आल्या पासुन सतेत आसलेले घराने आसुन ही कला प्रत्येकालाच जमत नाही असे नायगांवकरांच्या बाबतीत कौतुकास्पद उदगार माजी खाजदार मा.श्री.भास्करराव पाटील खतगावकर यांनी काढले आहे.