किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

सोने चांदी उजळून देणाऱ्या बिहार राज्यातील दोन भामट्याला पोलिसांनी केले अटक* *कंधार तालुक्यातील मौजे तेलंगवाडी येथील घटना

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.23.जिल्यातील कंधार येथून जवळच असलेल्या मौजे तेलंगवाडी ता.कंधार येथे बिहार राज्यातील दोघा जणांनी सोनं चांदी उजळून देतो.म्हणून १५००० रुपये किंमतीची चांदी वितळून घेणाऱ्या भामट्यांना उस्माननगर पोलिसांनी केली अटक.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.२१ फेब्रुवारी रोजी सौ.शशिकलाबाई रमेश मुपडे यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले की, सकाळी साडेनऊ वाजता घरामध्ये कोणीही नसताना दोन भामटे घरामध्ये आले.सौ.शशिकलाबाई मुपडे या अंगणात भांडे घासत होत्या. हे पाहून अनोळखी दोन इसम अंगणात येऊन तुम्हाला भांडे धुण्याचे पावडर पाहिजे आहे काय? असे विचारना करू लागले,सदरील महिलेने आम्हाला घ्यायचे नाही म्हणून त्यांना टाळाटाळ करीत होत्या.

दोन इसम जबरदस्तीने विनामूल्य आमची पावडर आहे तुम्ही घ्या, असी विनवानी करीत होते. तसेच सोन्या चांदीचे दागिने पण उजळून देतो,असे म्हणत होते. तेलंगवाडी येथील शशिकला बाई मुपडे यांच्या पायातील चांदीच्या बेड्याना पावडर लावली. यावेळी महिला विरोध करत असताना,बकीटातील घातकद्रवामध्ये बेड्या टाकल्याने काळ्या पडल्या होत्या.गयावया करेपर्यंत भामट्यांनी हातातील दंडकडे पण काढून पावडर लावली.हे असे प्रकार घडत आसताना महीला गहीवरून भयभीत झाली होती.

बिहार राज्यातील भामटे हे सोन्या-चांदीला उजाळून देत आहोत असे म्हणू लागले.तेव्हा शशिकला बाई यांचा मुलगा मारुती मुपडे हा आला येथे लोक घरापाशी काय करत आहेत असे विचारले,असता भामटे मुलाला म्हणाले की लोकांना आम्ही चांदीचे,सोन्याचे बेड्या दंडकडे मंगळसूत्र उजळून देत असतोत. मारुती याने बकीटात हात टाकुन चांदीचे दागिने पाण्यातून काढून पाहिले असता त्याचे वजन कमी झाल्याचे आढळून आले.

भामट्यांनी गोंधळ पाहून दागिन्याना हात लावू नका हात काळे होतात,असे म्हणत बकीटातील पाणी सांडून बकीट घेऊन एक इसम पळून गेला.

शशिकला बाई मुपडे यांच्या पतीने,मुलाने,इतर गावातील लोकांनी सदर इसमास पकडून पोलीस स्टेशनला फोन केला. तेव्हा तात्काळ उस्माननगर पोलिस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक यांनी कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी भेट देऊन सदरील आरोपीला पकडले.सदर इसमास वैद्यकीय तपासणी करून पोलीस स्टेशनला आणून विचारपूस केले, असता सदर इसमाचे नाव मोहम्मद मुजाहिद्दीन मोहम्मद जब्बार अली वय २५ वर्ष रा.पचनचीया ता.गोपालपूर जि.भागलपूर राज्य बिहार असे त्यांनी नाव सांगितले.

पळवून गेलेल्या ईसमाचे महम्मद इजाज महम्मद सुदी रा.पचगाचिया ता.गोपालपुर जि.भागतपुर राज्य बिहार यांना भांडे धूत असताना दोघा जणांनी चांदीचे बेड्या ५० तोळे,दंडकडे १५ तोळे,असे उज्वल देऊन त्यातील २९ तोळे चांदी वितळून घेऊन गेले.त्याची अंदाजे किंमत ( पंधरा हजार रुपये)१५०००/रु. ची चांदी अन्यायाने विश्वासघात, फसवणूक केल्याबद्दल उस्माननगर पोलिस स्टेशने दोघांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून अटक करण्यात आली आहे.त्यांचा तपास सपोनि ज्ञानोबा देवकते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब थोरे,पो.का. मुंडे,पो.हे.महाबळे, पो.का.रेजितवार,चालक कांबळे, पोलीस मित्र उद्धव घोरबांड हे तपास करीत आहेत.

430 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.