ग्रामपंचायत गावठाण हद्दीतील प्लाट नोंदणी ( रजिस्ट्री ) चालू करण्यात यावी – विनोद पवार
तालुका प्रतिनिधी: ग्रामपंचायत गावठाण व नविन विस्तार प्लाट चे नोंदणी ( रेजिस्ट्री ) हे बंद असुन सर्व सामान्य नागरिकांना प्लाट विकताना व खरेदी करताना अडचणी येत आहे.
तसेच कोरोणा महामारी मुळे जणता आर्थिक विवंचनेत अडकली आहे.
आता काही दिवसांतच खरिप पेरणीला सुरुवात होणार आहे तसेच दवाखान्यात लागणारा खर्च, लग्नासाठी , शिक्षणासाठी , व इतर काही कामासाठी पैशाची आवश्यकता असणार्या प्लांट धारकांना अनेक संकटाशी सामना करावा लागत आहे.
रजिस्ट्री बंद असल्याने प्लाट धारकांना कवडीमोल प्लाट विकण्याची वेळ आली आहे.
खेडे, गाव विकास संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष विनोद पवार व गोरसेना तालुकाध्यक्ष कैलास राठोड यांच्याकडून उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट, तहसील कार्यालय, व पंचायत समिती कार्यालय यांना निवेदन देण्यात आले आहे.