किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

किनवट स्थित दुर्दशन कार्यालयाच्या वर असलेल्या अति उंच टॉवरवर गांधीनगर वासियांच्या पुनर्वसन ची मागणी घेऊन “टॉवर आंदोलन” सुरू.

किनवट/प्रतिनिधी: आज दिनांक 23 मे 2022 रोजी दूरदर्शन कार्यालयाच्या वर असलेल्या अति उंच टावर गांधी नगर वासियांच्या पुनर्वसन ची मागणी घेऊन आतिउंच टावरवर “टॉवर आंदोलन” सुरू आहे.

किनवट येथील गांधी नगर झोपडपट्टीवर गेल्या 6 महिन्यापूर्वी मा. कोर्टाच्या आदेशानुसार नगरपालिकेने बुलडोझर चालवून गांधीनगर नेस्तनाबूत केले होते. सदरील गांधीनगर वासियांना तात्पुरत्या स्वरूपात समता नगर येथील मोकळ्या जागेत जागा देण्यात आली होती. परंतु नगरवासीयांच्या मागणीनुसार त्यांना घरे बांधून देण्यात आले नाही. गांधीनगर वासियांना घरे बांधून देण्यात यावी याकरिता माजी नगराध्यक्ष अरुण आळणे व ऍड.आकांक्षा आळणे यांच्या नेतृत्वाखाली 6 महिन्यापासून साखळी उपोषण सुरू होते.
या संबंधित दिनांक 18 मे 2022 रोजी नगरपालिका मुख्याधिकारी /नगराध्यक्ष नगरपरिषद किनवट यांना राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या तालुका अध्यक्षा एडवोकेट आकांक्षा आळणे यांनी एक निवेदन सादर केले होते.

यात सहा महिन्यापासून गांधीनगर चे पुनर्वसन नसल्यामुळे दिनांक 23 मे 2022 पासून आंदोलन करीत आहोत असे निवेदन देऊन कळविले होते.त्याच्या प्रतीलीपी एसडीएम साहेब,किनवट, तहसीलदार साहेब किनवट, जिल्हाधिकारी साहेब नांदेड यांना देण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
अचानक सदरील आंदोलन सुरू झाले व सदरील बातमी समजतात किनवट शहरातील अनेक नागरिकांनी या घटनेकडे धाव घेतली व बघता बघता किनवट तहसील कार्यालयाच्या प्रारंगात प्रचंड गर्दी झाली.
याबाबत पोलिस स्टेशनला काहीही कळविले नसल्याचे उपस्थित पोलिसांनी आमच्या प्रतिनिधी वर जवळ सांगितले . परंतु पोलिस कर्मचाऱ्यांना ही बातमी समजताच psi पवार,psi घुले,बिटजमदार चौधरी,बोदमवाड आदी कर्मचारी उपस्थित होते.
बातमी लिहेपर्यंत पोलीस प्रशासन वगळता कोणत्याही प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी दिसून आले नाही.

आंदोनकर्ते प्रशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते.

722 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.