गणेशपूर येथे अस्वलाने केला शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला
किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर)
किनवट पासून 8 किलोमीटर अंतरावर गणेशपूर येथील दत्ता रामलू वानखेडे वय 50 सायंकाळी 5 वाजता शेतकरी शेतात काम करत असताना वन्य प्राणी अस्वलाने शेतकऱ्याला जीवे मारण्याच्या प्रयत्नामध्ये शेतकऱ्याचे तोंडाचा लचका घेतल्याने शेतकरी गंभीर अवस्थेत असून ग्रामीण रुग्णालय गोकुंदा येथे सध्या उपचार घेऊन पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवल्या चे समजते.
सदर घटना वन विभागाच्या दुर्लक्षामुळे घडली आहे असे नागरिकांमध्ये चर्चा होत असून वन विभागाने जंगलाच्या भोवती कुंपण करणे गरजेचे असताना केलेले नसल्यामुळे सदरची घटना घडल्यामुळे गावामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
550 Views