गुरुजनांचा आदर करणे हि भारताची संस्कृती आहे हि परंपरा जोपासण्याचे काम तरुणांनी केले पाहिजे -माजी नगराध्यक्ष के.मूर्ती
किनवट ता. प्र दि ०५ शिक्षक तेथे वाद नाही संवाद आहे, प्रश्न आणी उत्तर आहे, हिंसा नाही क्षमा आहे, हाव नाही समाधान आहे, धमकी नाही धमक आहे, भिती नाही आधार आहे, शंका नाही विश्वास आहे, पैसा नाही श्रीमंती आहे, प्रकार नाही तेजस्वी आहे, हि जात नाही पण पत आहे. गर्वाने म्हणा मी शिक्षक आहे, बालपणा पासुनच आम्हाला मातृदेव भवः पितृदेव भवः अतिथी देव भवः हि शिकवण दिली जाते गुरुजनांचा आदर करणे हि भारताची संस्कृती आहे हि परंपरा जोपासण्याचे काम तरुणांनी केले पाहिजे असा संदेश शिक्षक दिना निमित्त आयोजित कार्यक्रमात बोलतांना किनवट नगर चे माजी नगराध्यक्ष के. मुर्ती यांनी शिक्षकांना सन्मानित करण्या करिता आयोजित कार्यक्रमात केले.
आज शिक्षक दिनांचे औचित्य साधुन शहरातील श्री रेणुकामाता मल्टीस्टेट को- ऑप अर्बन क्रेडीट सोसायटीच्या वतीने शाखा प्रमुख एल एच करपे यांनी शिक्षकांचा सन्मान या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यावेळी ते बोलत होते. या आयोजित शिक्षक गौरव कार्यक्रमात तालुक्यातील दिलीप पाटील, गणपती सुतार, राम बुसमवार, विनायक देशपांडे, भानुप्रकाश उत्तरवार, रामेश्वर पराते, गजानन कुडमेते, व्हि.सी गेडाम, आशिष क-हाळे पाटील आदि सह अनेक शिक्षकांचा सत्कार करुन त्यांना शिक्षक दिना निमित्त सन्मानित करण्यात आले.
यावेळी किनवट शहरातील सिराज जिवानी, रामेश्वर पांडे, पत्रकार किशन भोयर आदिसह अनेकांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बॅक शाखेचे एम. एम. वाघमारे, मोधीनी मोरे मॅडम, सुनिल चव्हाण, प्रतिभा मेश्राम, गजानन आडे आदी कर्मचा-यांनी प्रयत्न केले.