महाशिवरात्री निमित्त किनवट तालुक्यातील ठीकठीकाणी असलेल्या शिव मंदिरात विविध धार्मिक विधि व कार्यक्रमाव्दारे मोठ्या उत्साहात महाशिवरात्रीचा सण साजरा
किनवट ता. प्र दि ०१ महाशिवरात्री निमित्त किनवट तालुक्यातील ठीकठीकाणी असलेल्या शिव मंदिरात विविध धार्मिक विधि व कार्यक्रमाव्दारे मोठ्या उत्साहात महाशिवरात्रीचा सण साजरा करण्यात आला. यात मौजे अंबाडी येथिल हेमाडपंथी बालाजी मंदिरात असलेल्या शिव मंदिरात भाविकांनी दर्शनाकरिता गर्दी केली होती या वर्षी अंबाडी येथिल मंदिरात जिर्णोधाराचे काम चालु असल्याने परिसरात अमुलाग्र बदल झालेला आहे त्यानिमित्त येथे महाप्रसाद भंडा-याचे हि आयोजन केले आहे. या सोबतच किनवट शहरातील कैलासधाम मंदिर, सिध्दीविनायक मंदिरा संस्थान मधिल शिव मंदिर, पैनगंगातीरी असलेले शिव मंदिरात दर्शनासाठी सकाळ पासुनच दर्शनासाठी भाविक भक्तांच्या मोठ मोठ्या रांगा लागल्या होत्या.
तर किनवट शहरात प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय माऊंट आबु व्दारा संचलित किनवट येथिल कन्हैय्या नगर आणी राजेंद्र नगर येथे हि महाशिवरात्रीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महाशिवरात्रीचे अध्यात्मिक रहस्य या विषयावर प्रबोधन करण्यात आले तर मदनापुर येथिल महादेव मंदिरात ओम शांती परिवाराकडुन प्रदर्शनी लावण्यात आली या प्रदर्शनीचा लाभ हि भाविक भक्तांनी घेतला.
मंदिर तर ग्रामिण भागातील मौजे मदनापुर येथिल शिव मंदिर व मौजे नागढव, मौजे राजगड, मौजे धामनदरी येथिल शिव मंदिरात विविध ठीकाणाहुन आलेल्या भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. नागढव येथिल दरवर्षी भरणारी यात्रा या वर्षी नेहमी सारखी भरली नसुन तरी दर्शनाकरिता भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
मौजे धामनदरी येथिल गडावर असलेले शिव मंदिर व मौजे अंबाडी येथिल प्राचिन हेमाडपंथी बालाजी मंदिराचा समावेश तिर्थक्षेत्र विकास योजनेत करावा अशी मागणी येथिल नागरीकांची गेल्या अनेक वर्षापासुन ची आहे तर या निमित्त राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे राहुल नाईक हे शासन दरबारी याकरिता प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले असुन या करिता लवकरच वरिष्ठ अधिका-यांना व पक्षाच्या पदाधिका-यांकडे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. मौजे धामनदरी येथिल शिव मंदिर हे सौदर्य संपन्न असुन येथे गडावर मंदिर स्थापन केलेले असुन येथुन लोणीचे तलाव, बाजुचे धामनदरी गाव व परिसरात असलेली वन संपदा पाहता नयनरम्य वातावरण असुन येथे भाविक हे दर्शन दुहेरी उद्देशाने घेतात एक तर ट्रेकिंगचा आनंद हि मिळतो, निसर्गाचा सहवास लाभतो, यामुळे आरोग्य हि उत्कृष्ठ व चांगले राहते व धार्मिक दर्शनाचा आनंद हि प्राप्त होतो यामुळे येथिल शिव मंदिरात भाविक मोठ्या प्रमाणात येतात.