दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र सगरोळी ता बिलोली येथे दिव्यांगाचा मेळावा संपन्न
बिलोली :-तालुक्यातील सगरोळी येथे दिव्यांग वृध्द निराधार मिञ मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग वृध्द निराधार यांच्या अनेक प्रश्नासाठी मेळावा संपन्न झाला.
प्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल कुंचेलीकर,ता.अध्यक्ष बाबाजी होनपारखे, ता प्रसिद्ध प्रमुख राजेंद्र शेळके ईतर पाहुण्याचा सत्कार करून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली.
प्रस्ताविक ता अध्यक्ष बालाजी होनपारखे यांनी दिव्यांग मेळाव्याचा उद्देश व संस्थापक अध्यक्ष मा.डाकोरे पाटिल यांनी दिव्याग बाधवाना संघटितपणे नांदेड जिल्ह्यात शासन प्रशासन यांना जागे करण्यासाठी शंभर सनदशीर आंदोलन केल्यामुळे आज दिव्यांग बांधवाना गाव पातळीवर सवलती मिळत आहेत सर्व सवलती मिळण्यासाठी गाव तिथ दिव्यांग संघटनेच्या बोर्डाचे शाखा बिलोरी तालुक्यात स्थापन करून आपला हक्कासाठी डाकोरे पाटिल यांच्या पाठिशी उभे राहाण्याचे आव्हान केले.
संस्थापक अध्यक्ष मा डाकोरे पाटिल यांनी दिव्यांग वृध्द निराधार यांनी आपल्या हक्कासाठी संघटितपणे संघर्ष केल्याशिवाय काहि मिळत नाही ऊदा दिव्यांगाना त्यांना हक्काच्या सवलती मिळाव्या म्हणुन 2016 ला दिव्यांग कायदा करून सुध्दा आपण जागे नसल्यामुळे आपला हक्क मिळत नाही.
जर आपणास हक्क मिळावा म्हणून प्रत्येक गावात दिव्यांग संघटनेच्या बोर्डाची स्थापना करावी तेंव्हा शासन प्रशासन जागे होईल व आपल्या दिव्यांग निधीची चोरी होनार नाहि, दिव्यांगाना ञास दिला जाणार नाही असे म्हणताच दिव्यांग बोर्डाची स्थापना करण्याची सर्वानुमते ठराव पास झाला.दिव्यागाचा ग्रामपंचायत चा निधी स्वंतञ दिनी देण्यात येईल असे ग्रामसेवक यांनी सांगितले .
व सगरोळी शाखेची कार्यकारी सर्वानुमते निवड करण्यात आली आली ती पुढील प्रमाणे
सगरोळी सर्कल प्रमुख शंकर म्हैञे शाखा प्रमुख किसनराव चूनमवार, शा उपप्रमुख प्रकाश सुरकटलवार.शा कोषअध्यक्ष अभिषेक पांचाळ.शा.सचिव रामलु मोगरेवार, सहसचिव साईनाथ माचापुरे महिला शा.ऊज्वला गवाले, म सचिव लक्ष्मीबाई गोरठकर यांची निवड करून पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या
हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सर्व गावातील दिव्यांग बांधव उपस्थित होते असे प्रसिध्दी प्रमुख राजेंद्र शेळके यांनी दिली