तहसील व सरकारी कार्यालयात फिडिंग रूम करावी – अँड.सोनल पोळ
कोपरगाव: तहसील व सर्व सरकारी कार्यालयात लहान बालकांना फिडिंग रूम (स्तन पान कक्ष) करावी अशी मागणी अँड.सोनल पोळ यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार योगेश चंद्रे साहेब यांना केली
आपल्या निवेदनात पोळ पुढे म्हणाल्या की , तहसील व सर्वच सरकारी कार्यालयात सरकारी कामानिमित्ताने अनेक महिलांची वर्दळ सुरू असते या महिलांसोबत लहान मुले असतात बऱ्याच वेळा या महिलांना लहान मुलांना दूध पाजावे लागते त्या करिता त्यांना कुठेतरी आडोसा शोधावा लागतो मात्र लहान मुलांना दूध पाजयचे असेल तरी मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्यामुळे महिलांची मोठी कुचंबणा होते त्यामुळे लहान मुलांची व महिलांची कुचंबणा होऊ नये म्हणून तहसील व सर्वच सरकारी कार्यालयात लहान मुलांकरिता फिडिंग रूम उपलब्ध करून द्यावी
एका बाजूला शासन महिला व बालकांच्या विकासासाठी सुख सुविधा देत असताना व सर्वच सरकारी कार्यालयात महिलांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्नशील असताना अजूनही बऱ्याच शासकीय कार्यालयात फिडिंग रूम ची (स्तनपान कक्ष नाहीत तरी ते त्वरित सुरू करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे