प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ भंडारा जिल्हा कार्यालयाचे २६ मार्चला उद्घाटन
भंडारा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या आदेशान्वये व राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे भंडारा जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य सुरू असून सात तालुके व शहरातील नवनियुक्त कार्यकारीणी गठनांचे कार्य प्रगतीपथावर असून ते लवकरच पूर्ण होणार आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, भंडारा जिल्हा कार्यालयाचे दि. २६ मार्च २०२२ रोजी वार शनिवार प्रेसमिडीया स्टूडियो – गणेश चौक, जि.प. केंद्रीय प्राथमिक शाळेच्या बाजूला, गणेश वार्ड, साकोली येथे दु. २:३० वा. संपन्न होत आहे.
याप्रसंगी उद्घाटक म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष पंकज वानखेडे उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक ॲड. मनिष कापगते, तालुका पत्रकार संघ साकोलीचे अध्यक्ष राजेशसिंह बैस, ज्येष्ठ पत्रकार अशोक गुप्ता, दैनिक सकाळच्या पत्रकार मनिषा काशिवार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जिल्हा महिला युवती अध्यक्षा रोहिणी रणदिवे, साकोली तालुकाध्यक्ष निलय झोडे, लाखनी तालुकाध्यक्ष संजय भोले, लाखांदू तालुकाध्यक्ष प्रा. प्रेमानंद हटवार, पवनी तालुकाध्यक्ष प्रशांत शहारे, साकोली ता. उपाध्यक्ष साहिल रामटेके, सचिव मनिषा काशिवार, सहसचिव चेतक हत्तीमारे, प्रसिध्दी प्रमुख निकीता कुंभरे, साकोली शहर अध्यक्ष ऋग्वेद येवले, सचिव प्रा. ताराचंद कापगते, सदस्य मदन लांडगे, सौरभ गोस्वामी, मनोज गजघाट, देवेंद्र रहांगडाले, प्रभारी उपाध्यक्ष रवि भोंगाने, रविंद्र घरत आदी पदाधिकारी, पत्रकार व मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी आपण या उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहावे असे संघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष आशिष चेडगे यांनी आवाहन केले आहे.