एसपींचे आदेश धाब्यावर; वाई बाजारात खुलेआम वरली-मटका सुरू!
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.3.अवैध धंदेवाल्यांना कुणाचे अभय? महिनाकाठीचे लाखोचे कलेक्शन कुणाच्या खिशात?वाई बाजार येथील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावे,गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणे,त्याचबरोबर अवैधधंद्यांना आळा घालणे व त्यावर कडक कारवाई करून पोलिसांचा धाक कायम ठेवणे,हे पोलिसांचे काम आहे.
परंतु,माहूर तालुक्यातील वाई बाजार येथे अवैध धंद्यांना ऊत आला असून,या अवैध धंद्यांना कुणाचे अभय आहे? आणि महिनाकाठी चालणारे कलेक्शन कुणाच्या खिशात जाते? याचा जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी शोध घेण्याची गरज आहे. माहूर तालुक्यातील वाई बाजार येथील वरली मटक्यांची काउंटर थाटली गेली असल्याचे दिसून येत आहे.
वरली-मटका सुरू असलेल्या पोलिस व एलसीबीचे दुर्लक्ष केले जातात.सिंदखेड पोलिस व गुन्हे शाखेच्या नाकावर टिच्चून हे अवैध धंदे सुरू आहे आणि याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष का केले जात आहे.
नांदेडचे पोलिस अधीक्षकांनी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले आहेत.परंतु,वाई बाजार पोलीस स्टेशनंने हे आदेश अक्षरशःधाब्यावर बसवले गेले असल्याचे आढळून येते आहे.
वरली मटका पोलिसांना माहिती नाही,असे नाही.तरीही पोलिस त्यांच्यावर कारवाई का करत नाही? या अवैध धंद्यावाल्यांनी आम्हाला दिलेल्या गोपनीय माहितीनुसार,या भागातून दरमहा मोठे कलेक्शन होत असून,हे कलेक्शन कुणाच्या खिशात जात आहे? हा प्रश्न आहे.(एलसीबी) यांना दिसत नाही का? महिलावर्गाची मोठी कुचंबणा होत आहे.तसेच,या अवैध धंद्यामुळे अनेक गोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त झालेले आहेत.
वाई बाजार मुख्य बाजारपेठ असल्याने शेतकरी येथे मोठ्या प्रमाणात येत असतो, व दिवसाढवळ्या त्याच्या खिशावर दरोडा घालण्याचे काम हे अवैध धंदेवाले करत असतात.त्यामुळे शेतकरी व मजूरवर्ग यांच्यात घरात या अवैध धंद्यामुळे वाद निर्माण होत असून,त्यांची मोठी आर्थिक लूटही सुरू आहे. अनेकजण वरळी -मटक्याच्या नादी लागून बरबाद झाल्याने आत्महत्यादेखील केलेल्या आहेत.
चालूच ठेवलेले अवैध धंदे वाई बाजार वरली-मटक्याकडे नांदेडचे जिल्हा अधिक्षक यांनी लक्ष घालावे,अशी मागणी सर्वसामान्य नागरिक करत आहेत.