किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

नराधम युवक अफताब यांच्या अमानवीय व राक्षसी कृत्याचा निषेध करण्यासाठी किनवट येथील विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने  मोर्चा संपन्न

किनवट (शहर प्रतिनिधी) दिल्ली येथे नराधम युवक अफताब यांनी जे अमानवीय व राक्षसी कृत्य केले आहे. त्याचा निषेध करण्यासाठी किनवट येथील विविध हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने  मोर्चा संपन्न झाला
        मुंबई येथील राक्षसी वृत्तीच्या नराधम अफताब यांनी श्रद्धा नावाच्या हिंदू मुलीचा दिल्ली येथे नेऊन तिचे 35 तुकडे करून खून केला आहे. दिनांक 19 नोव्हेंबर रोजी किनवट येथे या  निंदनीय घटनेचा निषेध करण्यासाठी व या नराधमास फाशी व्हावी या मागणीसाठी बजरंग दल ,विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी या हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीने संयुक्तमोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी पालक महिला व पुरुष प्रचंड संख्येने उपस्थित होते.
हा मोर्चा साई वंदना मंगल कार्यालय किनवट येथून निघून शिवाजी चौक येथे संपन्न झाला. या ठिकाणी काही मुलींनी उत्स्फूर्तपणे आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी दुर्गा वाहिनीची कार्यकर्ती सुश्री वैष्णवी हिने, उपस्थित मुली व महिलांना आव्हान केले की, आपल्या सनातन हिंदू धर्माचा अभिमान बाळगून स्वतःचे रक्षण स्वतःच करण्यासाठी तत्पर राहावे. आपलीही श्रद्धा होऊ नये यासाठी लव्ह जिहाद या भयानक मानसिक बीमारी ला बळी न पडण्यासाठी आफताब चा आधार शोधू नका, पालकांनीही स्वतःच्या मुलींना वेळ देऊन, त्यांच्यावर योग्य ते संस्कार करण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी व्यक्त केले, हिंदू समाजाने असल्या अनेक मोर्चाच्या माध्यमातून सरकार दरबारी लक्ष वेधून लव्ह जिहाद यासारख्या या भयंकर षडयंत्राचा अटकाव करण्यासाठी कायदा संमत करण्याची सरकारकडे मागणी यावेळी करण्यात आली.

      या मोर्चात सौ पाळवदे ताई, सोना राठोड ,पुनम दीक्षित, गंगुबाई पारेकर, अनिता पिंपळवार, जया चा डावर ,माया पाठक स्नेहल जनावर, वंदना तिरम नवार ,अंजली राठोड ,पाटील ताई ,सारिक

116 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.