सापाच्या दंशने दिड वर्षाच्या चिमुकल्या बालकांचा मृत्यू
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.22. जिल्यातील धर्माबाद तालुक्या मधील पांगरी येथे घरात पलंगावर झोपले असता,आड्यावरुन खाली पडुन
दिड वर्षाच्या चिमुकल्या बालकाला सापाने दोन वेळेस चावा घेतल्याने बालकाचा मृत्यू झाला.ही घटना धर्माबाद तालुक्यातील पांगरी येथे गुरुवारी रात्री अकरा वाजता घडली.या घटने मुळे हळहळ व्यक्त होत आहे.
धर्माबाद तालुक्यातील पांगरी येथील सुमेध उत्तमराव लांडगे यांचें घर कौलारू चे होते.सुमेध व त्यांची पत्नी सह दिड वर्षाचा मुलगा सानिकेत हे नेहमी सारखे पलंगावर झोपले होते.
साप घरात कधी आला हे कोणालाच डोळ्यासमोर दिसला नाही. गुरुवारी रात्री अकरा वाजता साप अचानक आड्यावरुन दिड वर्षाच्या चिमुकल्या बालकांच्या सानिकेत च्या बाजुला पडला, सानिकेतला दोन वेळेस सापाने दंश केल्याने बालक रडु लागला.आई वडील यांना जाग येताच, साप मुलाला चावला असल्याचे दृष्टीस आले.लगेच चिमुकल्या बालकाला धर्माबाद येथील ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी आणले असता वैद्यकीय अधीक्षक डॉ.वेणुगोपाल पंडित यांनी बालकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
शुक्रवारी सकाळी ९-०० वाजता पांगरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.या चिमुकल्या बालकांचा मृत्यू झाल्यानें गावात हळहळ व्यक्त होत आहे.
सध्या पावसाळा दिवश असुन गावात विद्युत पुरवठा सतत खंडित होत असतो.गावात पुरवठा करणारी तीन डीपी जळाले असुन सांगुन ही अद्याप दुरुस्ती केले जात नाही.गावात सतत अंधार पडत असल्याने पावसाळ्यात विंचू किड्याची भीती वाटत आहे.महावितरण अधिकारी यांनी लक्ष देऊन डीपी बसवावी जेणेकरून असे प्रकार होणार नाहीत.लहान चिमुकला बालकांचा मृत्यू झाला आम्हा गावकऱ्यांना दु:ख होत आहे असे गावातील नागरिक चंद्रकांत पाटील पांगरीकर यांनी सांगितले.