1982 ची जुनी पेंशन योजना लागू करण्याबाबत किनवट तालुक्यातील जुनी पेंशन समन्वय समिती च्या वतीने आ.केराम यांना दिले निवेदन
किनवट/प्रतिनिधी: आज दि:16-12-2022 रोजी तालुका किनवट जि.नांदेड विधानसभा मतदार संघाचे आमदार आदरणीय भिमराव केराम साहेब यांना 1982 ची जुनी पेंशन योजना लागू करणे बाबत चे निवेदन किनवट तालुक्यातील जुनी पेंशन समन्वय समिती च्या वतीने देण्यात आले आमदार साहेबांनी संपुर्ण निवेदन वाचून यासंबधी पाठपुरावा करुन सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे सांगितलेले आहे. याप्रसंगी श्री चंद्रकांत नेम्मानीवार सर , श्री एस एम बोलेनवार सर , श्री ए एस पठाण सर श्री मोहम्मद लईक सर , श्री एस व्ही राऊत सर , श्री रहीम गौरी सर उपस्थित होते.
92 Views