उमरीत दिव्यांगाचे अर्धवट शिबिर सोडून डॉक्टरांसह नर्सने मारली दांडी__* *ग्रामीण रुग्णालयाचा ढिसाळ कारभार नागरीक त्रस्त
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.23.जिल्यातील उमरी येथे आजादी का अमृत महोत्सव कार्यक्रमांतर्गत उमरी तालुक्यासाठी दिव्यांगाचे तपासणी व प्रमाणपत्र शिबिराचे गुरुवारी आयोजन करण्यात आले होते या शिबिरात उपस्थित डॉक्टरांनी अर्धवट शिबीर सोडून दुपारी निघून गेल्याचे प्रकार पहावयास मिळून आला आहे.
जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमांतर्गत दिव्यांगासाठी तपासणी व प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले होते उमरी तालुक्यातील तळेगाव जिल्हा परिषद गट अंतर्गत हे शिबिर गुरुवारी उमरी येथील ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आले या शिबिरात तालुक्यातून अनेक लाभार्थी उपस्थित झाले पण यात विशेष म्हणजे तपासणी करणारे डॉक्टरच दुपारी शिबिर अर्धवट सोडून निघून गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे चिंचाळा येथील जमनाबाई लक्ष्मण सुंगुरवाड वय 48 हे अस्थिवंग रुग्ण असून यांना या ठिकाणी दुपारी तपासण्यात येऊन एक्स-रे काढण्याची चिठ्ठी देण्यात आली होती पण या ठिकाणी एक्स-रे टेक्निशियन नसल्याने ही बाई बराच काळ रुग्णालयात बसून होत्या सायंकाळी उशिरापर्यंत एक्सरे काढणारे कोणीच उपस्थित नसल्याने शेवटी या महिलेने शासनाच्या ऑनलाईन हेल्प तक्रार दाखल केली.यात विशेष म्हणजे तालुका आरोग्य अधिकारी, सहसंबंधित वरिष्ठ अधिकारी यांनी सुद्धा शिबिरातून निघून गेले ज्यामुळे दुपारी दोन नंतर उपस्थित डॉक्टरही दांडी मारली शिबिराचे वेळ सकाळी दहा ते पाच असे ठरविण्यात आले होते या शिबिरात मूकबधिर शाळेतील कर्मचारी व शिक्षक, पंचायत समिती व पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी ड्युटी लावून नोंदणी करण्याचे प्रमाण काढले हे कर्मचारी सायंकाळी पाच पर्यंत ठाण मांडून बसून होते पण आलेल्या दिव्यांगांना तपासणीसाठी कोणतेच डॉक्टर उपस्थित नसल्याने हे शिबिर कशाशी आहे? हा प्रश्न पडला होता.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने तालुक्यातील ग्रामीण भागातील लाभार्थी शेतातील कामे आटवून दुपारनंतर या शिबिराला हजेरी लावली पण या ठिकाणी डॉक्टर उपस्थित नसल्याने त्यांना तपासणी न करता रिकाम्या परतावे लागले आहे.