किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

माजी आमदार प्रदीप नाईकानीं शेतकऱ्यांचा शेताच्या बांधावर जाऊन झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे नुकसानीची केली पाहणी

सिंदगी (मोहपूर) ता. किनवट येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे अतोनात नुकसान झाले आहे तसेच गावातील काही घरातही पाणी शिरून घराचेही फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.नदी काठावरील शेती पुराच्या पाण्यात पुर्णतः खरडून गेली आहे तसेच बाजूची शेती सुद्धा अतिवृष्टीमुळे खराब झाली ही माहिती मिळताच भर पावसात माजी आमदार श्री प्रदीप नाईक साहेब तत्काळ शेतकऱ्यांचा शेताच्या बांधावर जाऊन झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीमालाचे नुकसानीची पाहणी केली तसेच तेथूनच मा. तहसिलदार साहेब यांना फोन करून विनंती केली की या सर्व शेताची आपण सरसकट नुकसान पंचनामे करून शेतकरी बांधवांना ताबडतोब शासनाची यांना मदत मिळावी म्हणून तहसीलदार साहेब यांना विनंती केली, तसेच तलाठी साहेब व ग्रामसेवक साहेब यांना सुद्धा फोन करून पंचनामे करण्यासाठी विनंती केली…सिंदगी येथील ईतर विषयांवर त्यात प्रामुख्याने शाळेच्या विषयावर मा. श्री. बने साहेब गटशिक्षणाधिकारी किनवट यांना तेथूनच फोन करून शाळेतील विद्यार्थ्यांची काही अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी म्हणून विनंती केली…व इतर विषयांवर चर्चा करण्यात आली त्यावेळी उपस्थित मा. आमदार श्री प्रदीप नाईक साहेब सोबत माजी जिल्हा परिषद सदस्य श्री बंडू नाईक, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी श्री. विशाल जाधव, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री अनिल पाटील कराले, राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष श्री बालाजी बामने, माजी पंचायत समिती सदस्य प्रेमसिंग जाधव,सिंदगी सरपंच प्रेमसिंग खोकले, श्री. रमेश राठोड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी सरपंच श्री. मारुती रामा पिपलेवाड, माजी सरपंच श्री गणपत आडगे, माजी चेअरमन श्री.शिवाजीराव शिरसाडकर,घोटी उपसरपंच श्री. राजू सुरोशे, श्री. कपील सातव भाऊ, तसेच उपस्थित मध्ये श्री.श्यामराव धुप्पे, श्री पुरणसिंग चव्हाण ,श्री उत्तम धुप्पे, श्री मारुती दुर्गेवाड , श्री.नितीन भाऊ बैस, श्री. दत्ता चिकने भाऊ, श्री.बालाजी शिरसाटकर ,श्री.दिलीप सिसूरे, श्री जयसिंग राठोड ,श्री प्रभाकर वानखेडे ,श्री श्रीरंग धुपे ,श्री अशोक नगारे ,श्री गजानन आंडगे, श्री शामराव सातपुते ,श्री सुनील जाधव ,श्री सुरेश पाटील, श्री विष्णू हुलकाने, श्री विजय हुलकाने, श्री दिनेश राठोड, श्री सुदाम राठोड, तसेच उपस्थित सर्व सिंदगी येथील ग्रामस्थ व उपस्थित युवक वर्ग सिंदगी ता. किनवट मोठ्या संख्येने उपस्थित होते

149 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.