किनवटमध्ये प्रथमच मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेचे आयोजन
किनवट(प्रतिनिधी)
किनवट तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमताचा विकास व्हावा त्याचबरोबर त्यांना लहान वयापासूनच स्पर्धा परीक्षेचे ज्ञान व्हावे या शुद्ध हेतूने किनवट तालुक्यात प्रथमच शासनमान्य मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे.आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे आहे.यात तरून निघण्यासाठी स्पर्धा परीक्षा हाच एकमेव मार्ग आहे. सर्व गोष्टींचा विचार करून मंथन आपल्यासाठी दर्जेदार अभ्यासक्रमासह स्पर्धा परीक्षेचे आयोजन करते.या परीक्षेचे वैशिष्ट्ये म्हणजे ही परीक्षा पारदर्शक पद्धत व संपूर्ण संगणकीय प्रणाली,विद्यार्थ्यांनी सोडविलेली उत्तर पत्रिका संकेतस्थळावर उपलब्ध.छापील प्रवेशपत्र, निकालपत्रक व OMR उत्तरपत्रिका बारकोडसह उपलब्ध.मंथन परीक्षा ही वार्षिक मूल्यमापन आहे जी संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानाचे आणि कौशल्यांचे मूल्यांकन करते. हे गणित, विज्ञान, सामान्य ज्ञान आणि मानसिक क्षमता या विषयांवर लक्ष केंद्रित करते.
सन 2023-24 या शैक्षणिक वर्षांमध्ये यावर्षी किनवट तालुक्यातील प्रथमच या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेचे प्रवेश फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर 2023 असून विलंबशील शुल्कासह 30 सप्टेंबर 2023 पर्यंत ऑफलाईन फॉर्म भरायचे आहेत. हे प्रवेश आवेदन ऑफलाइन फॉर्म किनवट माहूर तालुक्याचे तालुका मंथन समन्वयक मारोती भोसले मो.नं.9422267773 व हनुमंत दराडे मो.नं.7498914348 यांच्याकडे उपलब्ध आहेत. सदर मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा रविवार दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी किनवट येथे घेण्यात येणार. सदर परीक्षेचा निकाल हा ऑनलाइन वेबसाईटवर शनिवार दिनांक 30 मार्च 2024 रोजी मंथनच्या संकेतस्थळावर उपलब्ध होईल.यामध्ये मंथनच्या वतीने राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय प्रथम द्वितीय तृतीय चतुर्थ पाचवा असे एकूण पाच बक्षीस प्रमाणपत्र व आकर्षक ट्रॅफि दिल्या जाणार आहे.