दवंडी मोर्चासाठी हजारो मातंग बांधव मुंबईला जाणार
जिवती (चंद्रपूर ):-
आज दि 9/7/2023 रोज रविवार ला गोंडवाना महाविद्यालय जिवती येथे सकल मातंग समाजाची नियोजन बैठक पार पडली.अनु. जातींचे वर्गीकरण, आर्टीची निर्मिती आणि इतर मागण्यासाठी सकल मातंग समाज आयोजित पुणे ते मुंबई या “दवंडी मोर्चा” ची सभा 20 तारखेला आझाद मैदान मुंबई येथे होणार आहे. त्या सभेमध्ये सहभागी होण्यासाठी हजारो बांधवाना घेऊन जाण्याचे नियोजन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील सर्व प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
आणि प्रत्येक गावातून जास्तीत जास्त कार्यकर्ते मोर्चाला घेऊन जाण्यासाठी अनेकानी सूचना केल्या,अतिशय सकारात्मक चर्चा होऊन नंदीग्राम एक्सप्रेस ने 19 तारखेला निघण्याचे ठरले आहे. सभेच्या अध्यक्षस्थानी श्री भगवान डुकरे सर होते तर मार्गदर्शक म्हणून डॉ अंकुश गोतावळे, शाहीर तुकाराम जाधव, श्री विजयकुमार कांबळे , श्री दत्ता तोगरे,श्री देविदास कांबळे,प्रा. लिंबोरे सर,श्री व्यंकटी तोगरे सर,श्री राजाराम घोडके सर,डॉ दुर्गावाड साहेब,श्री चंद्रमनी वाघमारे,श्री दत्ता गायकवाड, शाहीर संभाजी ढगे, श्री केशव भालेराव श्री माधवभाऊ वाघमारे हे होते. सूत्रसंचालन श्री रमाकांत जंगापले यांनी प्रास्ताविक श्री विजय गोतावळे यांनी तर आभार प्रदर्शन श्री अंबादास कंचकटले यांनी केले. बैठकीच्या यशस्वीतेसाठी श्री दिगंबर आंबटवार,श्री प्रेमकुमार कांबळे,श्री शांतकुमार गोरे, श्री शाम नामपल्ले, श्री गोविंद वाघमारे, श्री बालाजी वाघमारे, श्री इमामवेल कांबळे, श्री जांभळे, श्री नामदेव कांबळे, श्री चंद्रभान केदासे, डॉ चरण केदासे, श्री कोमले साहेब,श्री नारायण वाघमारे,श्री लहू गोतावळे, श्री संतोष गोतावले, श्री विजय पी गोतावले, श्री अंबादास गोतावले, श्री यादव भालेराव, श्री विष्णू भालेराव, प्रा. पट्टेवाले सर, श्री रणजित सूर्यवंशी, श्री विलास वाघमारे, श्री तिरुपती वाघमारे, श्री गणेश कोमले,श्री आनंद पवार यांनी अथक परिश्रम केले.