श्रेय लाटण्याच्या शर्यतीत आमदार कल्याणकर जिंकले ; सीटूने केलेल्या आंदोलनाचा अनेकांना विसर : कॉ.गंगाधर गायकवाड
*५ सप्टेंबर रोज मंगळवारी बँक पासबुक महापालिका येथे जमा करावे*
शर्यत अजून संपलेली नाही ; कारण अजून आम्ही जिकंलेलो नाही : ५० किलो अन्न धान्याची लढाई अजून बाकीच
——————————————–
*नांदेड* : २६-२७ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टी मध्ये नांदेड शहरातील गोरगरीब,मजूर,कामगार आणि हातावर पोट असणाऱ्यांच्या घरात पावसाचे पाणी शिरून त्यांच्या संसाराचे होत्याचे नव्हते झाले होते.
सीटू संलग्न मजदूर युनियन कामगार संघटनेने शहरातील अनेक भागात संघटनेचे सभासद असलेल्या परिसरात सर्वेक्षण करून दि.२८जुलै रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन,राज्याचे मुख्य सचिव आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे सानुग्रह अनुदान स्वरूपात रोख वीस हजार रुपये आणि जीवनावश्यक १४ वस्तू सह अन्न धान्याची किट देण्यात यावी म्हणून मागणी केली होती. दि.३१ जुलै रोजी हजारो कामगारांना घेऊन वयक्तिक आणि संघटनेच्या वतीने कॉ. गंगाधर गायकवाड यांच्या स्वक्षरीने महापालिका आयुक्त महेश डोईफोडे यांच्याकडे अर्ज दाखल करून मागणी केली होती. अर्जाच्या प्रति मुख्यमंत्री, पालकमंत्री,राज्याचे मुख्य सचिव,जिल्हाधिकारी आदींना देण्यात आल्या होत्या.दि.३ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे हजारो कामगारांना घेऊन एक दिवशीय उपोषण करून नुकसान भरपाईच्या मागण्या करण्यात आल्या होत्या.हातात सीटूचे लाल झेंडे घेऊन नांदेडकर मोठ्या संख्येने व उत्साहाने आक्रमकपणे आंदोलनात सामील झाले होते.
दि.१४ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र दिनाच्या पुर्व संध्येला सीटूच्या नेतृत्वाखाली महापालिके समोर सामूहिक उपोषण करण्याची नोटीस जिल्हा प्रशासनास देण्यात आली होती. परंतु जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत राऊत यांनी जमाव बंदी आदेश काढल्यामुळे आणि आंदोलनास निर्बंध घातल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा आदर म्हणून त्या आंदोलनास स्थगती देण्यात आली होती. अतिवृष्टीची मदत तातडीने देणे हा नैसर्गिक न्याय आणि जबाबदारी असताना सरकार पूरग्रस्ता बाबत उदासीन असल्याचे लक्षात आल्यावर सीटूच्या दि.२८ ऑगस्ट रोजी महापालिका येथे हजारो कामगारांनी सत्याग्रह आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले होते. तेव्हा जिल्हाधिकारी कार्यालयास हस्तक्षेप करावा लागला आणि निवासी उप जिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी फोन वरून आश्वासन दिल्यामुळे आणि लाल बावट्याच्या आंदोलक कौशाबाई परचाके यांचा नांदेड वन विभागाच्या हयगयीमुळे मृत्यू झाल्याने सत्याग्रह आंदोलन रात्री उशिरा थांबविण्यात आले होते. सरकारला फैलावर घेत भर दिवसा सरकारचा उदो उदो करण्यात आला होता.
येवढा संघर्ष आणि पाठपुरावा करून सानुग्रह अनुदान स्वरूपात रुपये ३४ हजार ११५ पीडित पूरग्रस्तांना मंजूर करून घेतले आहेत परंतु एकनाथ शिंदे गटाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी आपल्या कार्यालयाच्या वतीने प्रसार माध्यमाना प्रसिद्धी निवेदन पाठवून सर्व श्रेय लाटण्याचा प्रयत्न चालवीला आहे.
त्यांनी श्रेय लाटले तर लाटले परंतु पन्नास किलो अन्न धान्य आणि बील कलेक्टर व तलाठी यांनी दुजाभाव करीत सर्वेक्षण करतेवेळी अनेक पूरग्रस्तांना डावलले आहे असा आमचा सुरवाती पासून आरोप आहे त्या नुसार योग्य चौकशी करून संबंधिता विरोधात आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम ५६ आणि ५७ नुसार कारवाई करावी आणि पन्नास किलो ग्रॅम अन्न धान्य देण्यात यावे ह्या मागण्या अजून अपूर्णच आहेत. म्हणून पुढील चार दिवसात पूर्तता झाली नाही तर आंदोलन अजून अटळ आहे. श्रेय कुणीही लाटो परंतु शर्यत अजून संपलेली नाही कारण अजून आम्ही जिंकलेलो नाही.असेच म्हणण्याची वेळ आली आहे. आ.बालाजी कल्याणकर यांनी पावसाळी अधिवेशनात पूरग्रस्तांचा प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे आणि मुख्यमंत्री यांचे लक्ष वेधले होते आणि मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी नांदेड शहरातील पूरग्रस्तांना प्रत्येक कुटूंबातील प्रमुख सदस्यांच्या नावाने दहा हजार रुपये पूरपडी मंजूर केल्याची घोषणा मुबंईच्या मंत्रालयातून केली होती आणि उशिरा का होईना नऊ कोटी रुपये निधी नांदेड जिल्हा कार्यालयास सुपूर्द केला असल्याचे निवासी उप जिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माध्यमातून कळविले आहे. त्यामुळे त्या सर्वांचे आभार सीटू चे जनरल सेक्रेटरी कॉ.गंगाधर गायकवाड यांनी मानले आहेत.
दि.५ सप्टेंबर रोजी सीटू च्या वतीने सभासद असणाऱ्या कामगारांचे बँक पासबुक सामूहिकरित्या महापालिका येथे जमा करण्यात येणार आहेत. असे देखील कॉ.गंगाधर गायकवाड यांनी कळविले आहे.तेव्हा ज्यांनी अर्जासोबत बँक पासबुक जोडले नाही त्यांनी दि.५ सप्टेंबर रोज मंगळवारी महापालिका येथे सकाळी ११ वाजता बँक पासबुक सत्यप्रत घेऊन यावे आणि आपले बँक पासबुक सुपूर्द करावे असे आवाहन सीटू कामगार संघटनेच्या वतीने करण्यात येत असल्याचे कॉ. गंगाधर गायकवाड यांनी कळविले आहे.