मुलाबाळासह बहिणीकडे गेलेल्या पत्रकारांच्या घरी चोरी; चोरट्यांनी 69 हजार रुपयाचा ऐवज केलेला लंपास.
किनवट/प्रतिनिधी: किनवट येथील पत्रकार विजय लक्ष्मीकांत जोशी राहणार बसवेश्वर चौक जुनी कापड लाईन किनवट यांच्या घरी ते गावाला गेले असता अज्ञात चोरट्यांनी दाराचे कुलूप तोडून घरात प्रवेश मिळवत नगदी व सोन्या चांदीचे दागिने मिळून 69 हजाराचा ऐवज लंपास केला.
विजय जोशी हे आपल्या बहिणीकडे दिनांक 10 एप्रिल रोजी मुलाबाळासह लातूर येथे गेले होते. याचा फायदा घेत कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी कडी-कोंडी तोडून घरात प्रवेश करून चोरी केली असल्याचे शेजारील दत्ता गिराम यांनी फोन करून बातमी कळविली.
दिनांक 12 एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास जोशी यांनी आपल्या घराची पाहणी केली असता सोनी कंपनी चा वापरता जुना टीव्ही अंदाजे किंमत 15 हजार रुपये व घरातील कपाटात ठेवलेले देवाचे चिल्लर अंदाजे 14 हजार रुपये व 11 ग्राम सोने चांदीचे दागिने असा अंदाजे 35 हजार रुपये चांदीचे दागिने जुने वापरातील 5000 असा अंदाजीत एकूण 69 हजार रुपयांचा माल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला. अशी तक्रार पत्रकार विजय लक्ष्मीकांत जोशी यांनी किनवट पोलीस स्थानकात केली असता किनवट पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्यां विरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 कलम 457, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील गुन्ह्याचा तपास पोलीस पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल तुकाराम वाडगुरे हे करीत आहेत.
शालेय परीक्षा संपल्यामुळे विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्ट्या लागल्या असल्यामुळे अनेक पालक आपल्या पाल्यासह गावीजात आहेत. याबाबत किनवटचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांनी नुकतेच नागरिकांना सूचना वजा आवाहन केले होते. सुट्टी काळात सर्व नागरिकांनी आपापल्या घराची स्वतः काळजी घेणे गरजेचे आहे.