डोंगरी विभाग विकास कार्यक्रमाची अमलबजावणी करण्याच्या दृष्टीने समिती गठीत
किनवट ता. प्र दि २८ राज्याच्या महाविकास आघाडी सरकार कडुन नांदेड जिल्ह्यातील डोंगरी विभाग विकास कार्यक्रमाची अमलबजावणी करण्याच्या दृष्टीने समिती गठीत करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात माहुर व किनवट हे दोन तालुके पुर्णगट निश्चित करण्यात आले असुन याकरिता कठीत करण्यात आलेल्या समिती मध्ये पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह ११ सदस्य आहेत.
राज्यातील तिन पक्षाच्या सरकारच्या अणुषंगाने किनवट तालुक्यातील शिवसेनेच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जनाबाई डूडूळे, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे राहुल नाईक, भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस चे आशिष क-हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या समितीवर किनवट चे आमदार भिमराव केराम हे देखिल पदसिध्द सदस्य आहेत. यांच्यासह जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, अग्रणी बॅकांचे अधिकारी या समितीवर सदस्य म्हणुन काम करणार आहेत. यावेळी प्रसिध्द करण्यात आलेल्या पत्रकात जिल्हाधिकारी डॉ विपिन यांनी सांगितले कि डोंगरी विभाग विकास कार्यक्रमाअंतर्गत आराखड्यास उपरोक्त समितीची मान्यता घेण्यात येईल.
राज्याच्या महाविकास आघाडी सरकारने तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना यावर काम करण्याची संधी दिल्याने राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे माजी आ. प्रदीप नाईक यांचे खंदे समर्थक राहुल नाईक यांना या पदावर काम करण्याची संधी दिल्याने राहुल नाईक यांचे समर्थक आनंदी आहेत तर माजी आमदार यांनी एका सच्च्या कार्यकर्त्याला न्याय दिला असल्याचे यावेळी बोलले जात आहे. तर कॉग्रेसचे आशिष क-हाळे यांना या पदावर काम करण्याची संधी दिल्याने पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांचे तळागाळातील कार्यकर्त्या पर्यंत लक्ष असते त्यामुळे कोणत्याही पक्षात काम करणा-या कार्यकर्त्यांने पक्षात मेहनत घेतली तर एक ना एक दिवस त्याचे चिज होते असे ही झालेल्या या निवडीवरुन निदर्शनास येत आहे. तर यावेळी पत्रकारांशी बोलतांना राहुल नाईक यांनी सांगितले कि माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली माझ्या किनवट माहुर तालुक्यातील डोंगरी भागाचा अणुषेश भरुन काढण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. या बाबत लवकरच मा. जिल्हाधिकारी नांदेड यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचे ही त्यांनी यावेळी सांगितले.