जिवती तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समिती यांनी विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार यांची घेतली भेट
जिवती प्रतिनिधी: भारत देशात स्वातंत्र्याची 75 वी सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरा होत असेल तरी जिवती तालुक्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी, भूमिहीन यांनी अनेक हालअपेष्टा, अन्याय, अत्याचार सहन करून गेल्या 63 वर्षांपासून जमिनी वाहिती करून उदरनिर्वाह करीत आहे, परंतु इतक्या वर्षानंतरही राजकीय पुढाऱ्यांनी जिवती तालुक्यातील भूमिहीन शेतकऱ्यांच्या जमीन पट्ट्याचे विषय मार्गी लावण्याचे धाडस कोणत्याही नेत्याने केलेले नाही,त्यामध्ये आम्हा शेतकऱ्यांच्या दोन पिढ्या पूर्ण झाल्या,परंतु तिसऱ्या पिढीलाही स्वतःच्या जमिनीचा हक्काचा पट्टा व सातबारा मिळाला नाही.म्हणून लोकशाहीमध्ये हक्क व अधिकारासाठी लढणे गरजेचे आहे,त्यामुळे आपल्या येणाऱ्या पुढच्या भाविपिढीसाठी त्यांच्या ताबात असलेल्या जमिनीचा मालकी हक्क त्यांना मिळवा. यासाठी शेतकरी पुत्र म्हणून आमरण उपोषण करीत आहे, आपण या मागण्याची गांभीर्याने दखल घेऊन हे विषय सभागृहात मांडून समस्त जिवती तालुक्यातील जनतेला न्याय मिळवून द्याल, असे निवेदन विरोधी पक्षनेता विधानसभा (म. रा.) मा.विजय वडेट्टीवार साहेब यांना जिवती तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समिती तर्फे देण्यात आले, यावेळी उपस्थित सुग्रीव गोतावळे, सुदामभाऊ राठोड,लक्ष्मण मंगाम, शबीर जहागीरदार, मुकेश चव्हाण, विजय गोतावळे, बालाजी भूत्ते पाटील, विनोद पवार, प्रेम चव्हाण, दयानंद राठोड आदी उपस्थित होते.