शिक्षा म्हणजे काय? भारतातील शिक्षेचे प्रकार कोणते?
किनवट (तालुका प्रतिनिधी) माझ्या महाराष्ट्रतील तमाम बंधू व भगिनींनो आज आपण एका नवीन विषय घेऊन जे सर्वांच्या जिव्हाळ्याचा तर आहेच परंतु त्याची माहिती ही समाजाला असणे गरजेचे आहे ही माहिती चांगले परिणाम करणारी आहे म्हणतात ना न्यायनिर्णय व शिक्षा ह्या त्या देशातील सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय जीवनाचे यशापयश प्रदर्शित करत असते. त्याचप्रमाणे आपण आपल्या न्यायव्यवस्थेवर श्रद्धा ठेवतो न्यायव्यवस्था ही भारतीय संविधानाची अंमलबजावणी होत आहे का नाही यावर लक्ष ठेवून असते जर एखाद्या व्यक्तीने कायदा पाळला नाही तर त्याला शिक्षा होत असते. म्हणतात ना “इतरावर जर बसून सदाचाराचा परिपोष करणे ही नीती नव्हे” त्याप्रमाणे आपण शिक्षा पद्धती ही विचारपूर्वक स्वीकारलेली पद्धती आहे. भारतामध्ये अनेक प्रकारच्या शिक्षा पद्धती अवलंबिल्या आहेत त्यामध्ये “शिक्षाही बदल घेण्याच्या भावनेतून नसावी ती गुन्ह्याला धडा शिकवणारी व अपराध्याला सुधारणारी असावी” या भावनेतून शिक्षा दिली जावी हे विचारशैली भारतात स्वीकारण्याचा मानस परमपूज्य संविधानाने तसेच वैधानिक कायद्याद्वारे केलेला आहे. तसेच “शिक्षा” व “दंड” न भोगलेल्या उन्मत्त अपराध्याची विजयी “मुद्रा” ही त्याला व समाजाला त्याच्या शिक्षेने होणाऱ्या पिडेपेक्षा जास्त अमंगल बाब असते. त्यामुळेच आपल्याला असे प्रश्न पडतात की भारतामध्ये शिक्षा तर आहे परंतु ती किती प्रकारची आहे? भारतामध्ये शिक्षा म्हणजे काय? हे पाहत असताना सक्षम न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा किंवा दुष्कर्म केल्याबद्दल किंवा कायद्याने आवश्यक कामगिरी वगळल्या बद्दल ज्या वेदना व दंड दिला जातो त्याला सर्वसाधारणपणे “शिक्षा” असे म्हणतात तो मृत्यू दंड, कारावास, त्यामध्ये सश्रम व साधा करावास किंवा मुदत ठरवून दिलेल्या कारावास किंवा दंड किंवा मालमत्ता जप्तीची किंवा इतर शिक्षा होऊ शकतात किंवा सुनावली जाते.
भारतामध्ये खालील प्रकारे शिक्षेचे प्रकार आहेत.
*1) मृत्युदंड*
भारतामध्ये फासावर लटकून मरेपर्यंत फासावर लटकवण्याची शिक्षा सुनावली जाते ही शिक्षा भारतामध्ये फार प्राचीन काळापासून आहे. आणि तीच शिक्षा भारतीय विधीसंहितेने स्वीकारलेली आहे.
*2) कारावास*
या शिक्षेमध्ये दोन प्रकारच्या शिक्षा असतात आजन्म कारावास व वेळेने ठरवून दिलेला असतो. आजन्मकारावास हा संपूर्ण जीवनभर असतो यात दुमत नाही परंतु आजन्म कारावास जन्मभर असतो. हा कारावासाची अमलबजावणी सरकारकडे असल्यामुळे सरकार आजन्म कारावास अपराध्याच्या प्रवृत्तीवरून, त्याच्या शारीरिक व मानसिक परिस्थिती वरून व त्याच्या व्यवहारावरून राज्य सरकार किंवा संबंधित सरकार ती शिक्षा क्षमापित किंवा कमी करत असते. परंतु या शिक्षेमध्ये ज्या शिक्षेमुळे ज्या गुन्ह्यामुळे अपराद्याला मृत्यू दंडाची शिक्षा होऊ शकली असती न्यायालयाने शिक्षा अगोदरच सश्रम करावास असा बदल केलेली असेल किंवा दिली असेल तर त्यावेळेस मात्र त्या अपराध्याला 14 वर्षे हे त्या कारागृहात काढावेच लागतात 14 वर्षाच्या अगोदर राज्य सरकारने त्याची शिक्षा कमी करण्याची प्रक्रिया करावी लागते नंतरच ही अपराधी हा कारागराच्या बाहेर 14 वर्षानंतर निघत असतो मित्रांनो आजन्म कारवास म्हणजे हा मरेपर्यंत किंवा नैसर्गिक मृत्यू येईपर्यंतच करावास असतो परंतु राज्य सरकार हे त्या अपराध्याची शिक्षा कमी करत असल्यामुळे आपल्याला सामान्यपणे 14 वर्षे जन्म करावासाची व्याख्या आपण करत असतो आता आपण कारावास हे दोन प्रकारचे असतात.
सश्रम कारावास व साधा करावास
*1) सश्रम कारावास*
या कारावास म्हणजे अपराध्याला दगड फोडणे, खोदकाम, म्हणजे अवघड कामे लावले जातात सश्रम कारावास म्हणजे काय हे कायद्याने अथवा सर्वोच्च न्यायालयाने सांगितले नाही परंतु सश्रम कारावास हा कसा द्यायचा तुरुंग अधीक्षक किंवा अधिकारी ठरवत असतो. म्हणून तुरुंग प्राधिकरणाला जास्त महत्व प्राप्त झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने सश्रम कारावास किंवा साधा करावा भोगणाऱ्या व्यक्तीला वेतन देण्यात यावे असे सांगितले आहे. सध्या कुशल कामगार अपराध्याला 6 रुपये 52 पैसे, अर्धकुशल कामगार अपराध्याला 5 रुपये 92 पैसे व आकुशल कामगार अपराध्याला 5 रुपये 30 पैसे प्रत्येक दिवस असा रोजगार मिळत असतो.
*2) साधा कारावास*
तसेच साधा करावासा मध्ये अपराध्याला त्याच्या विनंतीनुसार काम दिले जाते. तर सश्रम कारावास मध्ये तुरुंगाधिकारी किंवा अधीक्षकांच्या इच्छेने काम दिले जाते परंतु सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले आहे की अपराध्याच्या शारीरिक ,मानसिक व बौद्धिक क्षमतेनुसार त्या अपराध्याला काम दिले तर ते सोयीचे होईल असे मार्गदर्शन सर्वोच्च न्यायालयाने केलेले आहे. मित्रांनो पुढील शिक्षेचा प्रकार आहे तो म्हणजे
*दंड*
मित्रांनो न्यायालय हे दंड लावत असतो दंड लावल्याप्रमाणे अपराध्याला दंड द्यावा लागतो मग तो कितीही लावल्या जातो किंवा तो कायद्याच्या चौकटीत बसून लावल्या जातो जर दंड न भरल्यास त्याची अपराध्याची
*मालमत्ता जप्ती* केली जाते मालमत्ता जप्ती हा प्रकार सुधा शिक्षे मध्येच येतो अशा प्रकारे आपण भारतात शिक्षेचे प्रकार किती आहेत ते आपण बघितले आहे मित्रांनो आजन्म कारावास हा संपूर्ण जीवन भर असतो परंतु अपराध्याच्या शारीरिक मानसिक परिस्थिती वरून राज्य शासन किंवा संबंधित सरकार हे त्या आजन्म कारावासाची शिक्षा कमी करत असते हे संभ्रम आपल्याला अगोदर दूर करावे लागेल मित्रांनो वरील माहिती जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कामाला आली तर लेखक स्वतःला धन्य समजेल तुमच्या जीवनात कुठेतरी सुख येण्यासाठी लेखकाने खारीचा वाटा उचलला हे त्याच्या मनात कृतज्ञता व्यक्त करेल.
विलास संभाजी सुर्यवंशी
राजेंद्रनगर किनवट ता. किनवट जि. नांदेड.
मो.9922910080