अग्नीपथ योजना” त्वरित रद्द करणे साठी किनवट तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने तहसीलदार किनवट यांच्या मार्फत मा.महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन.
किनवट/प्रतिनिधी: केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सैन्य भरती “अग्नीपथ योजना” त्वरित रद्द करणे बाबतचे निवेदन किनवट तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने तहसीलदार किनवट यांच्या मार्फत मा.महामहिम राष्ट्रपती यांना पाठविण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, भारतीय सैन्य दलातील प्रक्रियेत बदल करून केंद्रातील भाजपा सरकारने नुकतेच “अग्निपथ योजना” जाहीर केली आहे. या योजनेमुळे देशातील तरूणाचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण देशातील तरुणात रोष निर्माण झालेला आहे.
त्याचाच भाग म्हणून या “अग्निपथ” योजने बंद करण्यात यावी यासाठी या योजनेच्या विरोधात धरणे आंदोलन करून किनवट तालुका काँग्रेस तर्फे निवेदना मार्फत विनंती करण्यात आली आहे.
याप्रसंगी तालुका अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी सह तालुक्यातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.