हजरत टिपू सुलतान ब्रिगेड किनवट व उमरीच्या वतीने फळांचे वाटप
किनवट/प्रतिनिधी: हजरत टिपू सुलतान ब्रिगेड किनवटच्या वतीने आज किनवट येथे हजरत टिपू सुलतान जयंती निमित्त ग्रामीण रुग्णालय गोकुंदा येथे फळांचे वाटप करण्यात आले व जयंती साजरी करण्यात आली यावेळी उपस्थितटिपू सुल्तान ब्रिगेड चे जिल्हा अध्यक्ष सय्यद नदी,शेख शाकिर तालुका अध्यक्ष ,हाफिज तोसिफ साहब शहर अध्यक्ष,शेख रियाज युवा तालुका अध्यक्ष,मेहमूद शेख ,फारूक चव्हाण उपस्थित
*टिपू सुलतान ब्रिगेड तर्फे रूगणांना फळ वाटप.
टिपू सुलतान ब्रिगेड उमरी तर्फे आज देशाचे प्रथम स्वातंत्र्य सैनिक, पहिले मिसाइल मैन शहीद टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त ग्रामीण रुग्णालय उमरी येथे रूग्णांना फळवाटप करण्यात आले. टिपू सुलतान यांना इंग्रजाविरूद्ध स्वातंत्र्यासाठी स्वाभिमानाने शहीद होणारा एकमेव राजा म्हणून ओळखले जाते. परंतु टिपू सुलतान हे उत्तम शासक, असामान्य योद्धा तर होतेच त्याचबरोबर टिपू सुलतान हे वैज्ञानिक, समाज उद्धारक, तत्ववेत्ते, संशोधक, भूगर्भशास्त्रज्ञ, यांत्रिकी अभियंता होत.
टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान यांनी यावेळी सांगितले की, टिपू सुलतान हे फक्त राजे नसून राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक एकात्मतेची प्रेरणा देणारी व देशाला महाशक्ती बनवणारी विचारधारा आहे.
याप्रसंगी उमरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मा. मोहन भोसले साहेब, वैद्यकीय अधिकारी डाॅ. मारोती चंदापुरे, छत्रपती युवा सेना जिल्हाध्यक्ष रईस पठाण, टिपू सुलतान ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डाॅ. ज़हीरूद्दिन पठान, जिल्हा संघटक फयाज पठाण, उमरी तालुका अध्यक्ष सय्यद फेरोज पटेल, विद्यार्थी ब्रिगेड तालुका अध्यक्ष सय्यद सुलेमान, नजीर बेग, अलमास पटेल, जमील भाई इ.ची उपस्थिती होती.