नांदेड गुरु नानकजी यांच्या जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न ;दिलीपसिंग सोडी मित्रमंडळाच्या स्तुत्य उपक्रम
नांदेड( सूर्यकांत तादलापुरकर)
शहरातील गुरुद्वारा चौरस्ता परिसरात शिखांचे धर्म गुरू गुरू नानकजी यांच्या प्रकाश पर्व म्हणजेच त्यांच्या जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबीर दिलीपसिंघ सोडी मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात आले.या शिबिरात सर्व समाजातील नागरिकांनी सहभाग नोंदविला असून दरवर्षी सोडी मित्रमंडळाच्या वतीने अनेक स्तुत्य उपक्रम राबविले जातात.
शीख धर्मीयांचे धर्मगुरु गुरू नानकजी यांचा जन्मदिवस प्रकाश दिन म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो.त्यांच्या जयंती निमित्त दिलीपसिंह सोडी मित्रमंडळाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजप महानगराध्यक्ष प्रवीण साले यांच्याहस्ते करण्यात आले. या प्रसंगी अवतार सिंघ सोडी, व्यंकट मोकले,दिपकसिंघ सोडी,अनिलसिंह हजारी,प्रतापसिंघ खालसा,संदीप कऱ्हाळे,कुणाल गजभारे,अंबादास जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या रक्तदान शिबिरात सर्व समाजातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत रक्तदान केले.या प्रसंगी रवीसिंघ खालसा,दिलीप कलवाणी,दिनेश जोंधळे,आदित्य जोशी,शेरसिंघ भुल्लर,कालु ओझा,राहुल जायेभाये रिंकूसिंघ ढिल्लो यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.