किनवट परिसरातील कृषीसेवा केंद्रावर शुकशुकाट
उमरी बाजार :(मिलिंद पडगीलवार)आता सर्वत्र शेतकर्रांची पेरणीची लगबग चालु सुरू होणार असून ,सर्व शेतकरी पेरणीसाठी सज्ज झाले आहेत.
परंतू सर्वच कृषी केंद्रामध्ये शुकशुकाट दिसून येत आहे.
कारण,तेलंगाणामध्ये 25 मे पासून बियाणे विक्री चालू झाली आहे.तर महाराष्ट्रा मध्ये 1 जुन पासून विक्री सुरू झाली आहे.
जर पुर्व मोसमी पाऊस झाला असता तर लोकांनी पेरण्याची सूरवात पण केली असती .किनवट परीसरातील व ईतर जिल्यातील सूध्दा दररोज भरपुर वाहने अदीलाबाद येथे बियाणे खरेदी साठी शेतकरी जात आहेत त्यामुळे किनवट परीसरातील व शेजारी जिल्हयातील कृषिकेंद्र मध्ये शुकशुकाट पहायला मिळत आहे .
101 Views