किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए संदर्भात आजी माजी आमदार व जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांच्या सोबत किनवट येथे बैठक

किनवट ता. प्र. ०३ शहरातुन जात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ ए संदर्भात नांदेड चे जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी पुढाकार घेत विसंगत झालेल्या सर्व यंत्रणाची सांगड घातली असुन आज उपविभागीय अधिकारी कार्यालय किनवट येथे झालेल्या महत्वपुर्ण बैठकीत जिल्हाधिका-यांनी वन विभाग व राष्ट्रीय महामार्गच्या अधिका-यांना शहरातील मार्गाची रुंदी कृत्रिमरित्या १८ मिटर करण्यात आली त्यारुंदीला वाढवुन ती २७ मिटर एवढी रुंद कराण्याकरिता प्रक्रीया अवलंबण्याच्या संबधित विभागांना सुचना दिल्या तर यावेळी जिल्हाधिकारी डॉ विपिन इटनकर यांनी आयोजित बैठकीतुन यवतमाळचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना दुरध्वनीवरुन संपर्क साधुन या महामार्गा संदर्भात निर्माण झालेली विसंगती दुर करण्याकरिता पैनगंगा अभयारण्य पर्यावरण सनियंत्रण समितीची बैठक घेण्यात यावी याकरिताची प्रक्रीय अवलंबावी या विषयी चर्चा केली. तरी दोन्ही जिल्ह्याच्या जिल्हाधिका-यांनी या महामार्गाची शहरातील अशोक स्तंभ ते जिजामाता चौक येथिल रुंदी वाढवण्या संदर्भात सकारात्मक भुमिका घेतल्याने हा प्रश्न निकाली निघणार आहे.
आयोजित बैठकीत किनवट व माहुर शहरात दोन्ही बाजुने जागा सोडुन होत असलेल्या नाल्याचा विषय, किनवट शहरातील रुंदी, इको सेन्सेटीव झोन चे कारण व ग्रामिण भागात प्रलंबित कामे या बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
आयोजित बैठकीत आ. भिमराव केराम व माजी आमदार प्रदीप नाईक यांची देखिल उपस्थिती होती तर माजी आमदार प्रदीप नाईक यांनी इस्लापुर ते धनोडा पर्यंत या राष्ट्रीय महामार्गामुळे नागरीकांना भेडसावत असलेल्या समस्यांचा पाढा यावेळी उपस्थित जिल्हास्तरीय अधिका-या समोर वाचला तर इस्लापुर ते जलधारा, बोधडी दरम्यान या मार्गावरील दुरावस्ता, या मार्गावर अपघाताला आमंत्रण देणारे खड्डे पडले आहेत तसेच इस्लापुर, बोधडी, जलधारा, कोठारी, घोटी, राजगड, सारखणी, गोंडवडसा, वाई या गावातील रस्ते जेव्हा महामार्गाला जोडले जातात त्याठीकानी रस्त्यांची उंची समतल नसल्याने अनेक अपघात होत आहेत. कारण प्रवाशाला महामार्गाची उंची गाठण्याकरिता वाहन जोरात महामार्गावर आणावे लागत आहे त्यामुळे महामार्गावरील वाहन व ग्रामिण भागातील वाहनांचे अपघात मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे अप्रोच रोड, सर्व्हिस रोड चे काम पुर्ण केले गेले पाहिजे हि मागणी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी संबधित अधिका-याकडे केली.
जिल्हाधिका-यांनी यावेळी बैठकीत उपस्थित अधिका-यांना सांगितले कि, तालुक्यातील दोन्ही पक्षाने नेते व आजी माजी आमदार सुरात सुर मिळवुन एकच मागणी करत आहे याचा अर्थ हि समस्या जनतेची आहे यामध्ये कोणतेही राजकारण नाही त्यामुळे यांच्या सुचनांचा आदर करा व त्या कशा पुर्ण करता येईल या कडे लक्ष द्या.
शहरात होत असलेला मार्ग जर १८ मिटर रुंद बनवण्यात आला तर गोकुंदा येथे होणारा रेल्वे उड्डाण पुल बनु शकत नव्हता हि बाबत ज्यावेळी माजी आ. प्रदीप नाईक यांच्या लक्षात आली त्यावेळी यांनी आक्रमक पवित्रा घेत या विषयावर पुर्वी हि बैठक बोलावली होती तर पुसदचे वन संरक्षक व यवतमाळ चे जिल्हाधिकारी यांच्यासह राष्ट्रीय महामार्गाच्या अधिका-याकडे लेखी निवेदनाव्दारे पाठपुरावा केला होता. आजच्या बैठकीत हि जिल्हाधिका-यांना निदर्शनास आणुण देण्यात आले यावेळी जिल्हाधिका-यांनी आश्वासन दिले कि आम्ही आहोत ना प्रशासनामध्ये आम्ही तुमचे गोकुंदा येथिल रेल्वे उड्डाण पुल पुर्ण करु तर त्याकरिता या मार्गाची सरसकट रुंदी २७ मिटर हि अत्यावश्यक आहे. जे कि यापुढे २७ मिटर रुंद असे होईल असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
यावेळी बैठकिला सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण एच पुजार, राष्ट्रीय महामार्गाचे अभियंता साहुत्रे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माहुरचे नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, खरबी चे आर.एफ.ओ नितिन आटपाटकर, माजी नगराध्यक्ष साजिद खान, ता. अध्यक्ष प्रकाश राठोड, शिवसेनेचे व्यंकट भंडरवार, भाजपा नेते अनिल तिरमनवार, शहराध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार, प्रविण म्याकलवार, गटनेते जहिरोद्दीन खान, अंबाडी तांडाचे सरपंच प्रेमसिंग जाधव, स्विय सहाय्यक, निळकंठ कातले, कचरु जोशी, नौशाद खान, नितिन कदम पाटील, अमित माहुर यांची उपस्थिती होती यांच्यासह राष्ट्रीय महामार्गावरील अभियंता, कंत्राटदारांचे प्रतिनिधी, मुकादम यांची देखिल प्रमुख्याने उपस्थिती होती.

309 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.